सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान

मावळ्यांच्या पाऊलवाटा : मार्ग संवर्धन

गडाकडे नेणाऱ्या वाटांची काळजी. प्रवेशाच्या पायऱ्या, खडकाळ मार्ग आणि स्वयंसेवकांच्या कामाच्या नोंदी.

← दुर्गसेवेचे सर्व पैलू
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

मावळ्यांच्या पाऊलवाटा : मार्ग संवर्धन

दुर्गसंवर्धन मोहीम दुर्ग राजधेर दिनांक १३ ऑक्टोंबर २०२४ रोजी सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभागाच्या वतीने चांदवड येथील ऐतिहासिक राजधेर गडावर दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. या वेळी काळाच्या ओघात मातीच्या ढिगाऱ्याखाली बुजल्या गेलेल्या मुख्य प्रवेशद्वाराचा राजमार्ग दुर्गसेवक यांनी श्रमदान करून काही प्रमाणात मोकळा केला. स्थापत्यकलेचा अजोड नमुना असलेल्या दुर्ग राजधेरचे शिल्लक असलेले अवशेष शेवटच्या घटका मोजत आहे.…

मूळ नोंद पूर्ण वाचा

दुर्गसंवर्धन मोहीम दुर्ग राजधेर दिनांक १३ ऑक्टोंबर २०२४ रोजी सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभागाच्या वतीने चांदवड येथील ऐतिहासिक राजधेर गडावर दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. या वेळी काळाच्या ओघात मातीच्या ढिगाऱ्याखाली बुजल्या गेलेल्या मुख्य प्रवेशद्वाराचा राजमार्ग दुर्गसेवक यांनी श्रमदान करून काही प्रमाणात मोकळा केला. स्थापत्यकलेचा अजोड नमुना असलेल्या दुर्ग राजधेरचे शिल्लक असलेले अवशेष शेवटच्या घटका मोजत आहे. यावेळी उपस्थित दुर्गसेवकांनी शेकडो वर्षांपासून मातीत बुजलेला मुख्य दरवाजाच्या आड आलेले मोठे दगड व माती बाजूला करून काही प्रमाणात मोकळा केला. काही प्रमाणात मोकळा करीत इतिहास टिकविण्याचा प्रयत्न केला. लवकरच काही दिवसांत पुन्हा संवर्धन मोहीम राबवून दरवाजा पूर्णपणे मोकळा करण्याचा विश्वास दुर्गसेवकांनी व्यक्त केला.आगामी काळात दुर्ग राजधेरवरील ऐतिहासिक वास्तू जतन व संवर्धन करण्याची शपथ यावेळी सर्व दुर्गसेवक यांनी घेतली. सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने दुर्ग राजधेर येथे संवर्धन मोहिमा घेण्यात येणार असून या मोहिमांमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन दुर्गसेवकांनी केले. मोहीम यशस्वितेसाठी प्रतिष्ठानच्या दुर्गसेवक यांनी परिश्रम घेतले. उपस्थित दुर्गसेवक यांचा सदैव सार्थ अभिमान 🙏🚩 सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभाग अधिकृत पोस्ट- SPHMSMV 601/15102024 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
मावळ्यांच्या पाऊलवाटा : मार्ग संवर्धन · छायाचित्र १
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

मावळ्यांच्या पाऊलवाटा : मार्ग संवर्धन

स्वराज्यमंदीर राजगड 🚩 महावारसा स्वच्छता मोहीम स्वाक्षरी मोहीम बहुतेक जगात पहिल्यादांच UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत एकाच वेळी १२ दुर्ग येणार आहेत. यातील महाराष्ट्रातील ११ दुर्ग असून १ तामिळनाडू मधील जिंजी दुर्ग आहे. UNESCO शिष्य मंडळाची या महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्ष गडावर भेट असल्याने गड स्वच्छ रहावा यासाठी २२ सप्टेंबर रोजी समस्त शिवशंभू भक्तांच्या उपस्थीतीत ११ गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली..…

मूळ नोंद पूर्ण वाचा

स्वराज्यमंदीर राजगड 🚩 महावारसा स्वच्छता मोहीम स्वाक्षरी मोहीम बहुतेक जगात पहिल्यादांच UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत एकाच वेळी १२ दुर्ग येणार आहेत. यातील महाराष्ट्रातील ११ दुर्ग असून १ तामिळनाडू मधील जिंजी दुर्ग आहे. UNESCO शिष्य मंडळाची या महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्ष गडावर भेट असल्याने गड स्वच्छ रहावा यासाठी २२ सप्टेंबर रोजी समस्त शिवशंभू भक्तांच्या उपस्थीतीत ११ गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.. स्वच्छता मोहीमेत सहभागी संस्था - १. सह्याद्री प्रतिष्ठान पुणे विभाग, बारा मावळ, हवेली विभाग. २.PDEA कॉलेज मांजरी बुद्रुक पुणे. ३. ⁠ग्रामस्थ मंडळी. -गडावर करण्यात आलेल्या कामाची थोडक्यात माहीती.. -तटबुरूजांवरील वाढलेले गवत काढले, -पद्मावती माचीवरील गवत काढले, -गुंजवणे दरवाजा व पायवाट व पाण्याची टाकी साफ केली.. मोहीमेत सहभागी समस्त शिवशंभू भक्त, संस्था संघटना व या सोबतच केंद्रीय पुरातत्व व राज्य पुरातत्व विभागाचे विशेष सहकार्य लाभले त्याबद्दल या शासकीय विभागांचे हि मन:पुर्वक आभार..🙏🏻 आयोजक : समस्त शिवशंभू भक्त. महत्वाची टिप- समस्त भारतीयांना विनंती आहे की गडावर गेल्यास कोणीही कचरा करू नये व इतरांनाही करू देऊ नये, तसेच गड फिरायला गेल्यास उतरताना जेवढा कचरा उचलता येईल तेवढा उचलावा व गड स्वच्छ राहण्यास सहकार्य करावे... अधिकृत पोस्ट SPHMSMV 491/23092024 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
मावळ्यांच्या पाऊलवाटा : मार्ग संवर्धन · छायाचित्र १

खाणेरगड : वाटेवरील पायऱ्या

चाळीसगाव परिसरातील खाणेरगडावर वाटेच्या पायऱ्यांसाठी झालेल्या कामाची नोंद. खडकातील वाट आणि काम करणाऱ्या दुर्गसेवकांची छायाचित्रे मूळ मालिकेत आहेत.

संपूर्ण मूळ नोंद ↗
खाणेरगड : वाटेवरील पायऱ्या · छायाचित्र १खाणेरगड : वाटेवरील पायऱ्या · छायाचित्र २खाणेरगड : वाटेवरील पायऱ्या · छायाचित्र ३
आणखी छायाचित्रे (2)
खाणेरगड : वाटेवरील पायऱ्या · छायाचित्र ४खाणेरगड : वाटेवरील पायऱ्या · छायाचित्र ५

छायाचित्र श्रेय

गडांची प्रातिनिधिक छायाचित्रे; संस्थेच्या मोहिमांची छायाचित्रे नाहीत.

Lohagad — Roadtripper876 · CC BY 4.0

Raigad — Aatakke · CC BY-SA 3.0

Images resized; displayed with responsive cropping and overlays. Film thumbnail: Sahyadri Pratishthan Official / YouTube. Logo supplied by Sahyadri Pratishthan. Founder and historical archive photographs supplied in the organisation’s presentation; original visible photographer credits are retained.