रास्तों और सीढ़ियों का संरक्षण
संस्था के आधिकारिक इंस्टाग्राम संग्रह से इस कार्य का विवरण। गतिविधियों और आयोजन का मूल मराठी विवरण नीचे पढ़ें।
मूल मराठी विवरण पढ़ें
दुर्गसंवर्धन मोहीम दुर्ग राजधेर दिनांक १३ ऑक्टोंबर २०२४ रोजी सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभागाच्या वतीने चांदवड येथील ऐतिहासिक राजधेर गडावर दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. या वेळी काळाच्या ओघात मातीच्या ढिगाऱ्याखाली बुजल्या गेलेल्या मुख्य प्रवेशद्वाराचा राजमार्ग दुर्गसेवक यांनी श्रमदान करून काही प्रमाणात मोकळा केला. स्थापत्यकलेचा अजोड नमुना असलेल्या दुर्ग राजधेरचे शिल्लक असलेले अवशेष शेवटच्या घटका मोजत आहे. यावेळी उपस्थित दुर्गसेवकांनी शेकडो वर्षांपासून मातीत बुजलेला मुख्य दरवाजाच्या आड आलेले मोठे दगड व माती बाजूला करून काही प्रमाणात मोकळा केला. काही प्रमाणात मोकळा करीत इतिहास टिकविण्याचा प्रयत्न केला. लवकरच काही दिवसांत पुन्हा संवर्धन मोहीम राबवून दरवाजा पूर्णपणे मोकळा करण्याचा विश्वास दुर्गसेवकांनी व्यक्त केला.आगामी काळात दुर्ग राजधेरवरील ऐतिहासिक वास्तू जतन व संवर्धन करण्याची शपथ यावेळी सर्व दुर्गसेवक यांनी घेतली. सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने दुर्ग राजधेर येथे संवर्धन मोहिमा घेण्यात येणार असून या मोहिमांमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन दुर्गसेवकांनी केले. मोहीम यशस्वितेसाठी प्रतिष्ठानच्या दुर्गसेवक यांनी परिश्रम घेतले. उपस्थित दुर्गसेवक यांचा सदैव सार्थ अभिमान 🙏🚩 सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभाग अधिकृत पोस्ट- SPHMSMV 601/15102024 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩