सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान

संकटकाळी रयतेचा आधार

महापूरानंतर कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गावांना औषधांची मदत. ठिकाण, विभाग आणि मोहिमेनुसार पडताळलेल्या नोंदी.

← दुर्गसेवेचे सर्व पैलू
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

महाड : विद्यार्थ्यांसाठी ९० शालेय किट

तळा-माणगाव विभागाने ५ सप्टेंबर २०२१ रोजी आकले, खरवली, कोंडीवते आणि गोठे बुद्रुक येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत केली.

मूळ नोंद पूर्ण वाचा

एक हात विद्यार्थी भावंडांसाठी सह्याद्री प्रतिष्ठान तळा माणगाव विभाग रायगड जिल्हा दि. ०५_सप्टेंबर_२०२१_ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाड_महाप्रलय_पूरग्रस्त_विद्यार्थ्यांसाठी_शालेय_साहित्य_वाटप सह्याद्री प्रतिष्ठान रायगड जिल्ह्या तळा माणगाव विभाग मधून १३ दुर्गसेवक तसेच महाड व मुंबई विभागातील १८ दुर्गसेवक यांना सोबत घेऊन रा.जि.प. शाळा आकले, खरवली, कोंडीवते, गोठे बुद्रुक महाड येथे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना ९० किट शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कर्तव्यपूर्ती कार्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक जिवलग सहकाऱ्यांच्या सदैव ऋणात.... आपल्या बांधवांसाठी आपणच उभं राहून आधार देणं हे आपलं आद्यकर्तव्य. विशेष आभार या कार्यासाठी शालेय साहित्य व आर्थिक मदत देणाऱ्या प्रत्येक देणगीदाराचे खूप खूप आभार सह्याद्रीचे दुर्गसेवक सदैव ऋणात आहोत. सह्याद्री प्रतिष्ठान तळा-माणगाव विभाग अधिकृत पोस्ट- SPHMSMV 0167/07092021 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा महाराज छत्रपति सह्याद्री स्वराज्य गडकिल्ले धर्मवीर जाणता राजा क्षत्रिय कुलावतंस

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
महाड : विद्यार्थ्यांसाठी ९० शालेय किट · छायाचित्र १
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

भडगाव : ५० कुटुंबांना जीवनावश्यक मदत

सोलापूर विभागाने कागल तालुक्यातील भडगाव येथील पूरबाधित कुटुंबांना धान्य, साहित्य आणि पाणी पोहोचवले.

मूळ नोंद पूर्ण वाचा

मदत नव्हे कर्तव्यच. एक हात मदतीचा. सह्याद्री प्रतिष्ठान सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील भडगाव गावातील पूरग्रस्तांना अजून मदत पोहोच झाली नाही असे संस्थापक अध्यक्ष(हुकुम) मा.श्री. श्रमिक सरांनी सोलापूर जिल्हा विभागाला कॉल करून कळविले तेव्हा लगेच पुढाकार घेऊन कोल्हापूरमधील मौजे भडगाव गावातील एकून पूरबाधीत कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली व ५० गरजू कुटुंबांना सह्याद्री प्रतिष्ठान सोलापूर जिल्हा विभागाकडून किमान एक महिना पुरेल अशा स्वरुपात धान्य, साहित्य व पाण्याची मदत पोहोच करण्यात आली. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, राजं, पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा ! मदत स्वरूपात साहित्य व धान्य दिलेल्या सर्वांच्या आम्ही सह्याद्रीचे दुर्गसेवक सदैव ऋणात राहू 🙏🏻. विशेष आभार- पंढरपूर विभाग, बार्शी विभाग, माळशिरस विभाग व सोलापूर जिल्ह्यातून मदत गोळा करण्यासाठी झटणारे सर्व दुर्गसेवक. अधिकृत पोस्ट SPHMSMV 0148/02092021 सह्याद्री प्रतिष्ठान सोलापूर. सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩 महाराज छत्रपति सह्याद्री स्वराज्य गडकिल्ले धर्मवीर

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
भडगाव : ५० कुटुंबांना जीवनावश्यक मदत · छायाचित्र १
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

जावळी : औषधांच्या १०० किटचे वाटप

२७ ऑगस्ट २०२१ रोजी मुकवली, वाठांबे आणि वहिटे येथे आशा सेविकांच्या हस्ते औषधांचे किट वाटण्यात आले.

मूळ नोंद पूर्ण वाचा

वंदनिय गुरूवर्य प्रा श्रमिकजी गोजमगुंडे सर यांचे जन्मदिनी सह्याद्री सातारा जिल्हा विभागाचेवतीने लोकवर्गणीच्या माध्यमातून मदत नियोजनानुसार हॉटेल फोडणी सातारा येथून जावळी तालुका पुरग्रस्तांसाठी देण्यात आलेले अत्यावश्यक ४ प्रकारच्या औषधांचे एकूण १०० किटस मुकवली, वाठांबे, वहिटे ता. जावळी, जिल्हा सातारा येथील पूरग्रस्तांना शुक्रवार दि. २७/०८/२०२१ रोजी आशा सेविकांचे हस्ते वाटप करण्यात आले. सहभागी दुर्गसेवक मावळे : १) केतन जानदेव धनावडे २) धनंजय शामराव विधाते ३) निखिल संजय धोंडे ४) शुभम धोंडीबा धनावडे ५) संकेत विष्णू करंजेकर सह्याद्री प्रतिष्ठान जावळी तालुका विशेष सेवा सहकार्य : १) समस्त पुरग्रस्त मदत निधीदाते २) आशा सेविका, तालुका जावळी ३) श्री. सागर सुदाम माने सर, ४) श्री. सोमेश रमेश अरगडे सर, ५) प्रिय सुरज सतिश नाळे सर ६) प्रिय प्रशांत लक्ष्मण उदूगडे सर ७) श्री. राजेंद्र सयाजीराव पाटील, ८) मा. व्यवस्थापक हॉटेल शाही फोडणी सह्याद्री प्रतिष्ठान सातारा जिल्हा विभाग. समस्त पुरग्रस्त मदत निधीदाते, आशा सेविका, वाहन सेवा देणारे, तसेच प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे पूरग्रस्त सहकार्य नियोजित कार्यात सेवा योगदान देणाऱ्या दुर्गसेवक तसेच समस्तजनांचे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सातारा विभाग सदैवच ऋणी राहिल. 🚩🏰🌳🇮🇳🙏😊 अधिकृत पोस्ट SPHMSMV 0129/28082021 सह्याद्री प्रतिष्ठान सातारा जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठान हिंदूस्थान (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
जावळी : औषधांच्या १०० किटचे वाटप · छायाचित्र १
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

महाड : कोल परिसरातील विद्यार्थ्यांना मदत

२२ ऑगस्ट २०२१ रोजी वसई-विरार विभागाने कोल आणि आसपासच्या गावांतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले.

मूळ नोंद पूर्ण वाचा

कर्तव्य रक्षाबंधनाचं एक हात विद्यार्थी भावंडांसाठी सह्याद्री प्रतिष्ठान वसई विरार विभाग पालघर जिल्हा २२ ऑगस्ट २०२१ महाड महाप्रलय पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप सह्याद्री प्रतिष्ठान पालघर जिल्ह्या वसई विरार विभाग मधून २ दुर्गसेविका व १४ दुर्गसेवक तसेच महाड व तळा तालुका आणि मुंबई विभागातील दुर्ग सेवक यांना सोबत घेऊन रा.जि.प. शाळा कोल,व ग्रुप ग्राम पंचायत कोल हद्दी अंतर्गत गावे, महाड येथे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शाळे कडुन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, वसई-विरार विभाग यांस विषेश आभार पत्रक देऊन आभार मानण्यात आले . या कर्तव्यपूर्ती कार्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक जिवलग सहकाऱ्यांच्या सदैव ऋणात.... आपल्या बांधवांसाठी आपणच उभं राहून आधार देणं हे आपलं आद्यकर्तव्य. विशेष आभार या कार्यासाठी शालेय साहित्य व आर्थिक मदत देणाऱ्या प्रत्येक देणगीदाराचे खूप खूप आभार सह्याद्रीचे दुर्गसेवक सदैव ऋणात आहोत. अधिकृत पोस्ट SPHMSMV 0125/23082021 सह्याद्री प्रतिष्ठान वसई-विरार विभाग सह्याद्री प्रतिष्ठान हिंदूस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
महाड : कोल परिसरातील विद्यार्थ्यांना मदत · छायाचित्र १
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

महाड : एक पाऊल शिक्षणाकडे

सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या उपक्रमातून गावडी, वरंध आणि धरणाची वाडी येथील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले.

मूळ नोंद पूर्ण वाचा

🖊️ छात्र देशस्य भूषणम्  🖊️ 📖एक पाऊल शिक्षणाकडे📖 सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व सह्याद्री विद्यार्थी अकादमी अंतर्गत एक पाऊल शिक्षणाकडे या उपक्रम अंतर्गत महाड मधील रा.जि. प शाळा गावडी, रा. जि. प. शाळा वरंध व रा. जि प. शाळा धरणाची वाडी येथीलपूरग्रस्त विद्यार्थ्यांना  शैक्षणिक  साहित्य वाटप करण्यात आले. पुरामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले आहे तेच नुकसान भरून काढण्यासाठी सहयाद्री प्रतिष्ठान व सह्याद्री विद्यार्थी अकादमी पनवेल विभागाचा हा एक छोटासा प्रयत्न करत  आहे. अधिकृत पोस्ट- SPHMSMV 0119/19082021 # सह्याद्री प्रतिष्ठान_पनवेल सह्याद्री विद्यार्थी अकादमी_पनवेल सह्याद्री प्रतिष्ठान हिंदूस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
महाड : एक पाऊल शिक्षणाकडे · छायाचित्र १
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

तापोळा परिसर : सहा गावांसाठी मदत

१२ ऑगस्ट २०२१ रोजी सोलापूर विभागाने तापोळा परिसरातील पाच आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावासाठी धान्य, साहित्य व पाणी पोहोचवले.

मूळ नोंद पूर्ण वाचा

मदत नव्हे कर्तव्यच. एक हात मदतीचा. सह्याद्री प्रतिष्ठान सोलापूर जिल्हा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, राजं, पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा ! गुरूवार दि.१२ ऑगस्ट रोजी, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या पुढे कोयना (शिवाजी सागर जलाशय) धरनाच्या (तापोळा) परीसरात अतिदुर्गम पूरग्रस्त भागातील ५ गावे व कोल्हापूर जिल्ह्यातील एक असे एकूण ६ गावांसाठी सह्याद्री प्रतिष्ठान सोलापूर जिल्हा विभागाकडून गरजू कुटुंबांसाठी किमान एक महिना पुरेल अशा स्वरुपात धान्य, साहित्य व पाण्याची मदत पोहोच करण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातून ४०-४५ दुर्गसेवक उपस्थीत होते. मदत स्वरूपात साहित्य व धान्य दिलेल्या सर्वांच्या आम्ही सह्याद्रीचे दुर्गसेवक सदैव ऋणात राहू 🙏🏻. विशेष आभार- पंढरपूर विभाग, बार्शी विभाग, माळशिरस विभाग व सोलापूर जिल्ह्यातून मदत गोळा करण्यासाठी झटणारे सर्व दुर्गसेवक. अधिकृत पोस्ट SPHMSMV 0114/17082021 सह्याद्री प्रतिष्ठान सोलापूर. सह्याद्री प्रतिष्ठान सातारा. सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
तापोळा परिसर : सहा गावांसाठी मदत · छायाचित्र १
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

भुदरगड : ३५० मदत किट

सह्याद्री प्रतिष्ठान शिरूर आणि व्ही लव शिरूर यांच्या मोहिमेत भुदरगड तालुक्यातील पूरग्रस्त गावांना अन्नधान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.

मूळ नोंद पूर्ण वाचा

*एक पाऊल समाजहितासाठी* पूरग्रस्तांना मदत म्हणुन सह्याद्री प्रतिष्ठान शिरूर व व्ही लव शिरूर च्या वतीने मोहीम राबविण्यात आली होती, त्या हाकेला प्रतिसाद देत तमाम शिरूर वासीयांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणुन भरभरून मदत केली, त्याबद्दल प्रथम त्यांचं खुप खुप आभार आणि धन्यवाद.. आणि जमा झालेली मदत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील शेणगाव,आकुर्डे,गारगोटी,शिसेवाडी,एरंडपे धनगरवाडा,वासनोली जोगेवाडी,तिरवडे आंबेडकरनगर, धनगरवाडा , चिक्केवाडी आदी पूरग्रस्त भागातील लोकांना अन्नधान्य,कपडे व जीवनावश्यक वस्तू आशा ३५० किटचे वाटप करण्यात आले. गरजु लोकांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी ज्या ज्या मावळ्यांनी सहकार्य केलं आपला अमूल्य वेळ दिला त्यांचंही आभार आणि धन्यवाद. अधिकृत पोस्ट- SPHMSMV 0097/12082021 सह्याद्री प्रतिष्ठान शिरूर ❤️ शिरूर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
भुदरगड : ३५० मदत किट · छायाचित्र १
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

सातारा : पाटण, जावळी व महाबळेश्वर मदत मोहीम

सातारा विभागाच्या नोंदीत चटया, ब्लँकेट, औषधे, धान्य, कपडे आणि इतर आवश्यक साहित्याच्या मदतीचा उल्लेख आहे.

मूळ नोंद पूर्ण वाचा

मदत नव्हे कर्तव्य माणूसकीचं सातारा जिल्हा पुरग्रस्त बांधवांसाठी अतिवृष्टी, पूरग्रस्त, भूसख्खलना मुळे अनेकांचे संसार, घरदार अर्थातच त्यांचे दैनंदिन जीवन उध्वस्त झालेल्यांना एक यथाशक्ती सहकार्य व्हावे म्हणून प्रसार माध्यमांवर आम्ही केलेल्या आव्हानानुसार लोक सहभागातून वस्तू तसेच आर्थिक निधीच्या मदतीने जीवनावश्यक वस्तू, सामान्य औषधे इत्यादी सह्याद्री प्रतिष्ठान सातारा जिल्ह्यातर्फे पाटण , जावळी आणि महाबळेश्वर येथील पुरग्रस्तांसाठी रविवार ८ जुलै २०२१ रोजी मदत करण्यात आली. ३०० चटई, ३०० ब्लँकेट ३०० औषधाचे किट (सॅनिटायझर, ताप, सर्दी, जुलाब १० गोळ्या प्रत्येकी ) सॅनिटरी नॅपकीन व अंतरवस्त्रे तांदूळ, गहू, बेसन, डाळी, खाद्य तेल बॉक्सेस, चटणी, तिखट, हळद, कपडे ९ बॅग , पाणी बॉटल बॉक्सेस, भांडी इत्यादी साहित्य. वरील मदत सह्याद्रीच्या दुर्गसेवकांच्या व लोकसहभागातून एक हात मदतीचा या अंतर्गत आर्थिक वर्गणी मधून घेण्यात आले. त्यासाठी सर्व वस्तू, निधी दात्यांचे आम्ही सह्याद्रीचे दुर्गसेवक आपल्या ऋणात राहू! अधिकृत पोस्ट- SPHMSMV 0091/09082021 सह्याद्री प्रतिष्ठान सातारा जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान. (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
सातारा : पाटण, जावळी व महाबळेश्वर मदत मोहीम · छायाचित्र १
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

चिपळूण : डोंबिवली विभागाकडून २०० किट

डोंबिवली विभागाने चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक साहित्याच्या २०० किटची मदत केल्याची नोंद आहे.

मूळ नोंद पूर्ण वाचा

होय कर्तव्यच सह्याद्री प्रतिष्ठान डोंबिवली विभाग यांच्याकडून चिपळूण भागातील पूरग्रस्त भागातील भावंडांसाठी अत्यावश्यक साहित्याची २०० किट ची मदत.... यासाठी अनमोल योगदान देऊन सहकार्य करणाऱ्या प्रत्येक हाताला त्रिवार मुजरा.... अधिकृत पोस्ट SPHMSMV 0085/07082021 सह्याद्री प्रतिष्ठान डोंबिवली. सह्याद्री प्रतिष्ठान_हिंदुस्थान (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
चिपळूण : डोंबिवली विभागाकडून २०० किट · छायाचित्र १
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

कणकवली : कातकरी कुटुंबांना मदत

३० जुलै २०२१ रोजी सिंधुदुर्ग विभागाच्या दुसऱ्या टप्प्यात कणकवली तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप झाले.

मूळ नोंद पूर्ण वाचा

मदत म्हणुन नव्हे तरं कर्तव्य सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग घेतला वसा दूर्गसंवर्धन चळवळीचा या तत्त्वावर चालणारे प्रतिष्ठान आज पुन्हा सिंधुदुर्ग वासियांच्या मदतीला धावले... सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागातर्फे दुसऱ्या टप्प्यात शुक्रवार दिनांक ३० जुलै २०२१ ला कणकवली तालुक्यातील कातकरी समाजाला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. जमेल तशी मदत पूरग्रस्तांना करत आहोत आणि करत राहूच. तसेच अजुन काही ठिकाणी मदत करणार असल्याने दात्यांना मदतीचे आवाहन करण्यात येतं आहे. अधिकृत पोस्ट SPHMSMV 0066/31072021 सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान (घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा)

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
कणकवली : कातकरी कुटुंबांना मदत · छायाचित्र १
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

खेरडी : अंबरनाथ विभागाची मदत

२८ जुलै २०२१ रोजी खेरडी येथे अन्नधान्य, फिनाइल, मेणबत्त्या, तेल आणि पिण्याचे पाणी वाटण्यात आले.

मूळ नोंद पूर्ण वाचा

कर्तव्य सह्याद्री प्रतिष्ठान अंबरनाथ विभागा तर्फे बुधवारी २८ जुलै २०२१ ला चिपळूणच्या खेरडी या गावी अन्न-धान्य, फिनाइल, मेणबत्ती, तेल, पिण्याच्या पाणी वाटप करण्यात आले. तसेच त्यांना अजुन काय मदत लागेल याचीही विचारपूस करण्यात आली. जमेल तशी मदत या पूरग्रस्तांना करत आहोत आणि करत राहूच.... अधिकृत पोस्ट- SPHMSMV 0059/30072021 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
खेरडी : अंबरनाथ विभागाची मदत · छायाचित्र १
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

पेठमाप : वसई-विरार विभागाची मदत

२८ जुलै २०२१ च्या मोहिमेत पेठमाप, चिपळूण येथे चटया, ब्लँकेट, कपडे, किराणा व स्वच्छतेचे साहित्य पोहोचवण्यात आले.

मूळ नोंद पूर्ण वाचा

सह्याद्री प्रतिष्ठान वसई विरार तालुका विभाग. २८ जुलै २०२१ चिपळूण महाप्रलय पूरग्रस्तांनच्या मदतीसाठी एक हात मदतीचे कर्तव्य. सह्याद्री प्रतिष्ठान पालघर जिल्हा विभागातील वसई विरार तालुका विभाग मधून एक टेम्पो दोन कार, २ दुर्गसेविका व १५ दुर्गसेवक तसेच रत्नागिरी विभागातील चिपळूण येथील दुर्ग सेवक यांना सोबत घेऊन पेठमाप चिपळूण येथे अतिशय गरजू कुटूंबाना अत्यावश्यक साहित्य, चटई, ब्लॅंकेट, कपडे, किराणा, सॅनिटरी पॅड, इत्यादी मदत करण्यात आली. या कर्तव्यपूर्ती कार्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक जिवलग सहकाऱ्यांच्या सदैव ऋणात.... अजूनही रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण याठिकाणी मदतकार्य मोहिम ही सुरूच आहे....आपल्या बांधवांसाठी आपणच उभं राहून आधार देणं हे आपलं आद्यकर्तव्य. विशेष आभार १) चिपळूण तालुक्यातील दुर्ग सेवक टीम यांच्या सदैव ऋणात आहोत. २) वसई टेम्पो ड्रायव्हर शंकर मोरे यांनी वेळेवर पोचवल्या बद्दल सदैव ऋणात आहोत. ३) या कार्यासाठी सामग्री व आर्थिक मदत देणाऱ्या प्रत्येक देणगीदाराचे खूप खूप आभार सह्याद्रीचे दुर्गसेवक सदैव ऋणात आहोत.👏🏻👏🏻 अधिकृत पोस्ट: SPHMSMV 0056/29072021 पालघर जिल्हा विभाग सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
पेठमाप : वसई-विरार विभागाची मदत · छायाचित्र १
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

रायगड : ५०० हून अधिक कुटुंबांना आधार

भोराव, आकले, कानगुळे व सवाद परिसरातील कुटुंबांना विविध विभागांच्या सहकार्याने किराणा, ब्लँकेट, कपडे आणि आवश्यक साहित्य दिले गेले.

मूळ नोंद पूर्ण वाचा

कर्तव्यच ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी संकटकाळी कायम आपण मदत करणं हे आपलं महत्वाचं कर्तव्य... हाच उद्देश मनात ठेवून पावसामुळे आलेल्या महापूर आपत्तीमध्ये अडकलेल्या संकटात सापडलेल्या रायगड जिल्ह्यातील भोराव, आकले, कानगुळे, सवाद या गावातील ५०० हुन अधिक अतिशय गरजू कुटूंबाना सह्याद्री प्रतिष्ठान च्या माध्यमातून अत्यावश्यक साहित्य, किराणा, ब्लॅंकेट, कपडे इत्यादी मदत करण्यात आली. यासाठी अलिबाग, पेण, पनवेल, डोंबिवली, मुंबई विभागाचे दुर्गसेवक अनमोल योगदान लाभले. या कर्तव्यपूर्ती कार्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक जिवलग सहकाऱ्यांच्या सदैव ऋणात... अजूनही पुणे जिल्ह्यातील भोर तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, सातारा जिल्हा, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण याठिकाणी मदतकार्य सुरूच आहे... आपल्या बांधवांसाठी आपणच उभं राहून आधार देणं हे आपलं आद्यकर्तव्य. अधिकृत पोस्ट- SPHMSMV 0048/26072021 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
रायगड : ५०० हून अधिक कुटुंबांना आधार · छायाचित्र १

छायाचित्र श्रेय

गडांची प्रातिनिधिक छायाचित्रे; संस्थेच्या मोहिमांची छायाचित्रे नाहीत.

Lohagad — Roadtripper876 · CC BY 4.0

Raigad — Aatakke · CC BY-SA 3.0

Images resized; displayed with responsive cropping and overlays. Film thumbnail: Sahyadri Pratishthan Official / YouTube. Logo supplied by Sahyadri Pratishthan. Founder and historical archive photographs supplied in the organisation’s presentation; original visible photographer credits are retained.