स्वराज्याचा तोफखाना : तोफगाडे संवर्धन
जय शिवराय 🚩 कालची दुर्ग हरगड दर्शन मोहिम फत्ते ...! मोहिमेत दुर्ग सेवकांनी मुल्हेर किल्ल्यावर विराजमान केलेल्या तोफांना पावसाळा पूर्व शाकारणी करण्यात आली, नंतर हरगड दुर्ग दर्शन मोहिम घेण्यात आली. त्यात किल्ल्याचे इतिहासिक महत्त्व ,किल्ल्याची रचना त्याचे महत्त्व समजून घेतले. बागलाण प्रांतात अतिशय महत्त्वाचा असा किल्ला आहे परंतु किल्ल्यावर जाण्यासाठी पाहिजे तशी पायवाट किंवा पायरी मार्ग नाही ,पर्यटकांसाठी अतिशय…
मूळ नोंद पूर्ण वाचा
जय शिवराय 🚩 कालची दुर्ग हरगड दर्शन मोहिम फत्ते ...! मोहिमेत दुर्ग सेवकांनी मुल्हेर किल्ल्यावर विराजमान केलेल्या तोफांना पावसाळा पूर्व शाकारणी करण्यात आली, नंतर हरगड दुर्ग दर्शन मोहिम घेण्यात आली. त्यात किल्ल्याचे इतिहासिक महत्त्व ,किल्ल्याची रचना त्याचे महत्त्व समजून घेतले. बागलाण प्रांतात अतिशय महत्त्वाचा असा किल्ला आहे परंतु किल्ल्यावर जाण्यासाठी पाहिजे तशी पायवाट किंवा पायरी मार्ग नाही ,पर्यटकांसाठी अतिशय धोकादायक असा किल्ला आहे. किल्ल्यावर पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था नाही मंदिरांची पडझड झाली आहे. हजार बांगडी तोफ अणि सुंदर दरवाजा आजही किल्ल्याच अस्तित्व जपून आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी पायरी मार्ग,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्या साठी प्रयत्न 100% करणार असा निर्धार दुर्ग सेवकांनी करून मोहिमेची सांगता केली. सर्व उपस्थिती दुर्ग सेवकांचा सार्थ अभिमान...! सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, कसमादे 🚩 अधिकृत पोस्ट- SPHMSMV 0336/03062024 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩
अधिकृत व्हिडिओमधील दृश्य
Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗