Sahyadri Pratishthan Hindusthan

Cleanliness drives

Volunteer service caring for fort surroundings, pathways and water tanks. Explore the work and teams in the campaign archive.

← All work categories
Official Instagram account · Published

Cleanliness drives

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

जय शिवराय दुर्ग सिंहगड स्वच्छता मोहीम सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंहगड विभाग ( पुणे जिल्हा ) दुर्ग सिंहगड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमधी पहिला दरवाजा वर येताच डाव्या बाजूला असलेला खांदकडा येथील तटबंदी आणि पाण्याच्या टाकीतील झाडे झुडपे साफ सफाई करण्यात आली. सोबत गडावरील केर कचरा आणि पाण्याच्या बॉटल गोळा करण्यात आला. ह्या मोहिमेत सह्याद्री चे दुर्गसेवक उपस्तिथ होते.. मोहिमेस हातभार लावण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे मनापासुन आभार 🚩🙏🏻 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंहगड विभाग ( पुणे जिल्हा ) घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा अधिकृत पोस्ट- SPHMSMV 659/17112025 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

Still from the official video

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Cleanliness drives · Photograph 1
Official Instagram account · Published

Cleanliness drives

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

दुर्ग प्रतापगड 🚩 महावारसा स्वच्छता मोहीम बहुतेक जगात पहिल्यादांच UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत एकाच वेळी १२ दुर्ग येणार आहेत. यातील महाराष्ट्रातील ११ दुर्ग असून १ तामिळनाडू मधील जिंजी दुर्ग आहे. UNESCO शिष्य मंडळाची या महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्ष गडावर भेट असल्याने गड स्वच्छ रहावा यासाठी २२ सप्टेंबर रोजी समस्त शिवशंभू भक्तांच्या उपस्थीतीत ११ गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.. स्वच्छता मोहीमेत सहभागी संस्था - -१)सह्याद्री प्रतिष्ठान सातारा जिल्हा विभाग २)शिवगंध प्रतिष्ठान , महाराष्ट्र , ३)नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे गणेश मंडळ, गोडवली -गडावर करण्यात आलेल्या कामाची थोडक्यात माहीती.. १) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक परीसरातील वास्तुंच्या भिंतीवरील तसेच श्री भवानी मंदिर प्रवेशद्वार येथील भिंतीवरील गवत काढण्यात आले. २) स्मारका पासून यशवंत बुरुजाकडे जाणाऱ्या तटबंदी वरील व संपूर्ण यशवंत बुरुजाच्या भिंतीवरील गवत काढण्यात आले व मातीत गाडलेल्या पायरी स्वच्छ करण्यात आल्या. ३) गडावरील ४ तोफांना गंजरोधक लोखंडी तोफगाड्यांची गंजरोधक रंग लावून शाकारणी करण्यात आली. ४) गडावरील आलेल्या पर्यटक व विद्यार्थ्यांना जागतिक वारसा नामांकन सही मोहीम मधे सहभागी करुन घेतले. ५) प्लास्टिक चा जमा कचरा गडाखाली आणला व प्रशासनाकडे जमा केला. विशेष सहकार्य स्थानिक प्रशासन मा.पोलीस पाटील , प्रतापगड मोहीमेत सहभागी समस्त शिवशंभू भक्त, संस्था संघटना व या सोबतच केंद्रीय पुरातत्व व राज्य पुरातत्व विभागाचे विशेष सहकार्य लाभले त्याबद्दल या शासकीय विभागांचे हि मन:पुर्वक आभार..🙏🏻 आयोजक : समस्त शिवशंभू भक्त. महत्वाची टिप- समस्त भारतीयांना विनंती आहे की गडावर गेल्यास कोणीही कचरा करू नये व इतरांनाही करू देऊ नये, तसेच गड फिरायला गेल्यास उतरताना जेवढा कचरा उचलता येईल तेवढा उचलावा व गड स्वच्छ राहण्यास सहकार्य करावे... अधिकृत पोस्ट SPHMSMV 494/23092024 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Cleanliness drives · Photograph 1
Official Instagram account · Published

Cleanliness drives

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

दुर्गराज रायगड स्वच्छता मोहीम 🚩 अखंड हिंदुस्तानचे मर्दानी दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या राजाभिषेक दिनानिमित्त तसेच आपल्या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान च्या १६व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दुर्गराज रायगड येथे स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. राजाभिषेक सोहळ्यानंतर किल्ले रायगडावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर कचरा साचतो. त्यामुळे गडाचे पावित्र्य टिकून राहत नाही. या मोहीमेच्या निमित्ताने सह्याद्रीच्या अनेक विभागांच्या दुर्गसेवकांनी मिळून काल रायगड स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. काल रात्री गडावर व आसपासच्या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. तरीही सह्याद्रीच्या जवळपास २२५ दुर्गसेवकांनी काल सकाळी लवकर गडावर मोहीमेसाठी हजेरी लावली. त्या सर्व दुर्गसेवकांना ३ समूहात विभागून त्यांनी गडावरील जगदीश्वर मंदिर ते भवानी टोक परिसर, होळीचा माळ ते वाघ दरवाजा परिसर, आणि शिरकाई देवी मंदिराच्या मागे अन्नछत्र(जिल्हा परिषद शेड), हत्ती तलाव व परिसरातील कचरा, मोकळ्या पाणी बॉटल, प्लास्टीकचा कचरा मोठ्या प्रमाणावर गोळा केला. आजच्या मोहीमेतील दुर्देव हे की जगदीश्वर मंदिराच्या मागील बाजूस भवानी टोकाकडे जाताना त्या परिसरात रिकाम्या दारूच्या बाटल्या सुद्धा सापडल्या. जवळपास अर्धे पोते भरेल एवढ्या दारूच्या बाटल्या गोळा करून त्या कचऱ्यामध्ये वाहून आणण्यात आल्या. रायगडसारख्या किल्ल्यावर असे प्रकार चालू आहेत हि फार मोठी शोकांतिका आहे. खरंतर राज्याभिषेक सोहळा झाल्यावर अनेक शिवप्रेमी व दुर्गप्रेमी संस्थांच्या सदस्यांनी रायगडावर येऊन गडावरचा कचरा गोळा केला होता. त्यामुळे गडमाथ्याच्या आजूबाजूला अवघड दऱ्यांमध्ये पडलेला कचरा गोळा करण्याची जबाबदारी सह्याद्रीच्या दुर्गसेवकांवर आली आणि ती जबाबदारी सर्वांनी चोख पार पाडली. एवढेच नाही तर सर्वांनी गोळा केलेला कचरा पायरी मार्गाने प्रत्येक दुर्गसेवकाने गडाच्या खाली आणला आणि प्रशासनाच्या ताब्यात दिला. अशा किती स्वच्छता मोहीमा करणार आणि किती कचरा साफ करणार! तरीही गड पूर्णपणे प्लास्टीकमुक्त होत नाही. दुर्गसेवकांनी गोळा केलेला सर्व कचरा गडाखाली आणताना एक गोष्ट निदर्शनास आली की गडाच्या महादरवाज्याच्या खाली पायरीमार्गाच्या आजूबाजूला अजूनही प्रचंड मोठ्या प्रमाणावर रिकाम्या प्लास्टीकच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. यावरून एकच वाटते की प्रशासन, ASI, RDA(रायगड विकास प्राधिकरण) यांनी गडावर प्लास्टीकबंदी केलीच पाहीजे. त्याशिवाय रायगडाचे पावित्र्य जपले जाणार नाही. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Cleanliness drives · Photograph 1
Official Instagram account · Published

Cleanliness drives

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

जय जिजाऊ,जय शिवराय 🙏🏻🚩 बांदा किल्ला स्वच्छता मोहिम सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, महिला विभाग सिंधुदुर्ग यांच्या मार्फत किल्ले बांदा या ठिकाणी २८ एप्रिल २०२४ रोजी स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यावेळी बांदा किल्ल्याच्या दरवाजा शेजारील तटबंदी वरील झाडी साफ करण्यात आली. तसेच किल्ल्यातील परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहीम वेळी सिया गावकर, कविता म्हापसेकर, ओवी आरोसकर,अश्विनी घाडीगावकर, स्थानिक करूणा परब, प्रियांका धुरी या सेविका उपस्थित होत्या. त्याना सहकार्य म्हणून महादेव धुरी हे स्थानिक दुर्गसेवक त्याच्या सोबत होते, यावेळी मोहिमेला उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांचे मनःपूर्वक आभार🙏🏻 नाष्ट्याची व्यवस्था हि पोलिस प्रशासन आणि स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर यांनी केली, तसेच जेवणाची सोय महादेव धुरी, औदुंबर परब आणि अजय आरोसकर यानी केली या सर्वाचे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 सह्याद्री प्रतिष्ठान महिला विभाग सिंधुदुर्ग अधिकृत पोस्ट- SPHMSMV 0266/04052024 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Cleanliness drives · Photograph 1
Official Instagram account · Published

Cleanliness drives

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

जय शिवराय🚩 दुर्गसंवर्धन मोहीम किल्ले इंद्राई शेकडो वर्ष उलटून गेलीत आहेत...असंख्य गडकोट आजही परकीयांच्या जुलमी आक्रमनामुळे तसेच वारे -वादळ -पाऊस यांना झेलता झेलता आपले अस्तित्व मातीच्या ढीगाऱ्याखाली गमावून बसले आहेत..... सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान गेल्या अनेक वर्षांपासून अशाच पराक्रमी स्वराज्य रक्षक गडकिल्यानां त्यांचे अस्तित्व मिळवून देण्याचे काम करत आहे त्यांचे संवर्धन आहोरात्र आणि दिवस करत आहे.... असाच एक दुर्ग किल्ले इंद्राई साक्षात इंद्राचा वास असावा असा प्रशस्त,बेलाग - कणखर दुर्ग किल्ले इंद्राईचा प्रवेशद्वार व पायरी मार्ग गेल्या शेकडो वर्षांपासून मातीच्या व तटबंदीच्या दगडाखाली गाडला गेला होता. इंद्राई किल्ल्याची ही अवस्था पाहून सहयाद्रीचे दुर्गसेवक कसे शांत बसणार... गेल्या २ महिन्यात २ संवर्धन मोहिम हाती घेऊन किल्ले इंद्राईला त्याचे प्रवेशद्वार परत मिळवून देण्यात यशस्वी ठरला. यावेळी भरपूर प्रमाणात दगड बाहेर काढण्यात आले. मातीत गाडला गेलेला प्रवेशद्वार तसेच पुन्हा नव्याने आपला पराक्रमी इतिहास अभिमानाने सांगन्यासाठी सज्ज झाला आहे. दुर्गसेवकांच्या अथक मेहणीतून प्रवेशद्वाराने घेतलेला मोकळा श्वास पाहून दुर्गसेवक सुखावले आहेत... सर्व दुर्गसेवकांच्या कष्टाचे चीज झाले.... प्रवेशद्वाराची पुष्प हार घालून.. भंडाऱ्याची उधळण करून जल्लोषात किल्ले इंद्राईला दिलेले संवर्धनाचे वचन पूर्ण करून...पुढील संवर्धन कार्याची शपत घेऊन मोहिमेची सांगता करण्यात आली. ह्या परम पवित्र कार्यात आपले कष्ट पणाला लावणाऱ्या सर्व दुर्गसेकांचा सार्थ अभिमान आहे..... जयोस्तु सहयाद्री.🚩🚩🚩🚩 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, नाशिक विभाग

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Cleanliness drives · Photograph 1
Official Instagram account · Published

Cleanliness drives

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

जय शिवराय 🚩🚩🚩 आज सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभागाच्या वतीने किल्ले देहरगड येथे दुतीय मोहिम घेण्यात आली..... प्रथम मोहिमेत गडावरील नामशेष स्थितीत असलेला प्रवेशद्वार मोकळा करण्यात आला होता. आज झालेल्या मोहिमेत गडावरील भव्य कातळातील कोरीव पाण्याचे टाके, जे अनेक वर्षा पासून गाळात व गडावरील ढासळलेल्या दगडानीं संपूर्ण व्यापलेलं होतं... सहयाद्रीच्या दुर्गसेवकांनी ह्याच भव्य टाक्यातील गाळ (माती) व मोठ- मोठे दगड काढून ह्या टाक्याला नवं संजीवनी देण्याचे कामं केले ह्या कार्यात टीम देहरगड यांचे सुद्धा सहकार्य लाभले..... येणाऱ्या काळात,ह्या टाक्यातील साचणाऱ्या पाण्याचा सर्वच दुर्गप्रेमीनां तसेच प्राणी व पक्षांना फायदा होणार आहे. ही मोहिम यशस्वी करून पुढील दुर्गसंवर्धन कार्याचे नियोजन करण्यात आले. 🙏🏻 जयोस्तु सहयाद्री 🚩🚩🚩 अधिकृत पोस्ट- SPHMSMV 840/09102023 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Cleanliness drives · Photograph 1

Archive account · date not recorded

Clean-ups and water-tank care

An extended photographic sequence records clearing vegetation and rubbish, cleaning water tanks and documenting participating teams. Unlabelled locations are not assigned a fort name by guesswork.

Full original account ↗
Clean-ups and water-tank care · Photograph 1Clean-ups and water-tank care · Photograph 2Clean-ups and water-tank care · Photograph 3
More photographs (8)
Clean-ups and water-tank care · Photograph 4Clean-ups and water-tank care · Photograph 5Clean-ups and water-tank care · Photograph 6Clean-ups and water-tank care · Photograph 7Clean-ups and water-tank care · Photograph 8Clean-ups and water-tank care · Photograph 9Clean-ups and water-tank care · Photograph 10Clean-ups and water-tank care · Photograph 11

World Heritage Week 2017

During 19–25 November 2017, activities included fort clean-ups, direction and history boards, and youth awareness sessions about conservation and the historical and geographical significance of the sites.

Full original account ↗
World Heritage Week 2017 · Photograph 1

Photography credits

Heritage photographs illustrate the forts; they do not depict the organisation’s campaigns.

Lohagad — Roadtripper876 · CC BY 4.0

Raigad — Aatakke · CC BY-SA 3.0

Images resized; displayed with responsive cropping and overlays. Film thumbnail: Sahyadri Pratishthan Official / YouTube. Logo supplied by Sahyadri Pratishthan. Founder and historical archive photographs supplied in the organisation’s presentation; original visible photographer credits are retained.