Sahyadri Pratishthan Hindusthan

Gateways of Swarajya

From preparing timber doors to carrying materials up a fort: explore the work and people behind the gateway programme.

← All work categories
Official Instagram account · Published

Torna: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान (स्वराज्यभूमी बारा मावळप्रांत विभाग) आयोजित, दुर्ग संवर्धन मोहीम ”दुर्ग तोरणा(प्रचंडगड)” दरवर्षी प्रमाणे यंदाही “सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान” च्या वतीने “दुर्ग तोरणा” वर ‘३० मार्च २०१९’ रोजी गडाचे बिन्नी दरवाजा व कोकण दरवाजा या २ प्रवेशद्वारास लाकडी दरवाजे बसवलेल्या दरवाजांची निगा राखण्याच्या उद्देशाने “शाकारणी मोहीम” राबवून त्या लाकडी दरवाजांवर चांगल्या दर्जाचे “Linseed Oil” किंवा Paint करतात. यावर्षीही ती मोहीम गुरुवार दि.२९ मे २०२५ रोजी राबवण्यात आली. तसेच गडावरील “कोकण दरवाजा” व दुसरा “बिन्नी दरवाजा” च्या उंबऱ्याच्या आतमध्ये माती व वाळू यांचा मोठा थर साचला होता. दरवाजाच्या खाली असणारे जुन्या काळातील पाणी जाण्याचे छिद्र बुजून गेले होते. त्यामुळे पावसाळ्यात गडावरून वाहून येणारे पाणी तिथे साचून दरवाजे खालून भिजत होते. सह्याद्रीचे दुर्गसेवक अजय महाले, आकाश दगडे आणि प्रज्वल ननावरे या तिघानी मिळून त्याठिकाणी असलेली माती व कचरा काढून पाणी जाण्याचे छिद्र मोकळे केले. परिणामी आता त्या ठिकाणी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेतली. दोन्ही दरवाजाला “Linseed Oil” चे२ हात मारले जेणेकरून पावसाच्या पाण्याचा व ऊन-वाऱ्याचा परिणाम त्या लाकडी दरवाजांवर होणार नाही. छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांचा ठेवा जपण्याचे काम सह्यद्रीचे दुर्गसेवक नेहमी करत आले आहेत व यापुढेही करत राहतील. !! जय शिवराय, जय गडकोट !! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान बारा मावळ विभाग भोर-राजगड अधिकृत पोस्ट- SPHMSMV 321/31052025 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Torna: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Rajgad: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

स्वराज्याचे प्रवेशद्वार पावसाळ्यापूर्वीची शाकारणी मोहीम राजधानी किल्ले राजगड 🚩 गेल्या वर्षी १ मे २०२२ रोजी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगड येथे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने ७ लाकडी प्रवेशद्वार(सागवानी दरवाजे) बसवण्यात आले होते. त्या मध्ये २ पाली दरवाजे, २ गुंजवणे दरवाजे, १ आळू दरवाजा, १ चोर दरवाजा व १ बालेकिल्ला दरवाजा अशा ७ प्रवेशद्वारांचे दुर्गार्पण करून किल्ले राजगडला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी व अनेक दानशूर व्यक्तींनी केला होता. काल १७ जून २०२३ रोजी राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्या ३४९व्या पुण्यतिथीनिमित्त पुन्हा एकदा सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी राजधानी किल्ले राजगड वर मोहीम राबवली आणि गेल्या वर्षी बसवलेल्या त्या दरवाजांना चांगल्या दर्जाचा Oil Paint Colour करण्यात आला. अमावस्येची काळोखी रात्र, सळसळता वारा, दाट धुके व अधून मधून पावसाच्या हलक्या सरी अशा परिस्थितीतही काल एका रात्रीत त्या सर्व ७ दरवाजांना Oil Paint Colour पूर्ण करूनच सह्याद्रीचे दुर्गसेवक आज सकाळी गडउतार झाले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व दरवाजांना Oil Paint Colour केल्यामुळे पावसाच्या पाण्याचा परिणाम सागवानी दरवाजांवर निश्चितपणे कमी प्रमाणात होईल. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व असलेल्या या गडांचा राजा आणि राजांचा गडाला नवसंजीवनी देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सदैव तत्पर राहील. !! जय शिवराय, जय गडकोट !! 🚩🏰🚩🏰🚩🚩🏰🚩🏰🚩 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान (स्वराज्यभूमी १२ मावळ विभाग) अधिकृत पोस्ट SPHMSMV 504/19062023 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Rajgad: gateway conservation · Photograph 1Rajgad: gateway conservation · Photograph 2Rajgad: gateway conservation · Photograph 3
Official Instagram account · Published

Ramshej: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

किल्ले रामशेज प्रवेशद्वार वर्षपुर्ती व्हय धनी आम्ही गड राखतोय...!!! सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभागाच्या वतीने बसविण्यात आलेल्या किल्ले रामशेजवरील दोन्ही अप्रतिम प्रवेशद्वारांच्या लोकार्पणाला आज एक वर्ष पूर्ण झाले. प्रथम वर्षपूर्तीनिमित्त प्रवेशद्वारांना शाकारणी करण्यात आली व फुलांची सजावट करण्यात आली. किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला मानवंदना देण्यात आली व हे दुर्गसंवर्धन कार्य अविरतपणे करण्यास आम्हा दुर्गसेवकांना अजून बळ मिळावे म्हणून प्रार्थना करण्यात आली. सह्याद्री प्रतिष्ठाण हिंदूस्थान सह्याद्री प्रतिष्ठाण नाशिक विभाग अधिकृत पोस्ट SPHMSMV 312/17042023 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Ramshej: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Ramshej: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

स्वराज्याचे प्रवेशद्वार किल्ले रामशेज आज स्वराज्यास अर्पण 🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Ramshej: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Ramshej: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

दोन दरवाजाचे ४ भाग अवघ्या २८ मिनिटात रामशेजवर पोहोंच झाले. उपस्थितीत ६५ दुर्गसेवकांना वंदन 👏 रामशेज प्रवेशद्वार दुर्गार्पण सोहळा १७ एप्रिल सकाळी १० वाजता सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Ramshej: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Ramshej: gateway conservation

Archived campaign announcement

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

किल्ले रामशेज वर बसविण्यात येणारे दोन्ही प्रवेशद्वार तयार किल्ले रामशेज 🚩 प्रवेशद्वार पुर्वतयारी मोहीम येत्या ११ तारखेला सोमवारी सकाळी ६ वाजता किल्ले रामशेज येथील बसविण्यात येणारे २ प्रवेशद्वार किल्ल्यावर घेऊन जायचे आहे. जास्तीत जास्त दुर्गसेवकांनी या मोहिमेत सहभागी व्हा. संपर्क- गणेश घोटेकर - साईनाथ सरोदे - नितीन ठोकळ - विशाल खैरनार-96237 00890 गोविंद जाधव 86987 78493 हेमंत भोईटे सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Ramshej: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Bankot: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

१९ वे प्रवेशद्वार स्वराज्यास अर्पण🎉 ३ एप्रिल रविवार रोजी बाणकोट किल्ल्यावरील भव्य प्रवेशद्वार दुर्गार्पण सोहळा पार पडला. शिवशंभू नावाचा गजर करीत आणि भंडाऱ्याची उधळण करीत हे भव्य प्रवेशद्वार स्वराज्यास अर्पण करण्यात आले. ८०० दुर्गसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला 🎉🚩 सह्याद्री प्रतिष्ठान श्रीवर्धन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आपले दुर्ग हेच आपला अभिमान आहेत आपल्या छत्रपतींच्या अस्तित्वाचे ते जिवंत साक्षीदार आहेत ! ते आपणच जपले पाहिजे आपला बलाढ्य देवदुर्लभ वारसा आपणच जपायला हवा आपल्या पूर्वजांनी रक्त सांडवलं आपल्याला तर फक्त आहे ते जपायचंय हे आपलं कर्तव्य आहे याची जाणीव प्रत्येकाला व्हावी हाच धडा दुर्गसंवर्धन करणाऱ्या संस्थांकडून घ्यावा आणि प्रत्यक्षात नसलात तरी अप्रत्यक्षपणे का होईना सहयाद्री च्या दुर्गसेवकांच्या पाठीशी सदैव उभं रहावं हीच प्रेमळ सदिच्छा ! सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान 🚩 घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा 💪 . . . उर्जास्थान ! प्रेरणास्थान ! श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज की जय🔥 . . .

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Bankot: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Bankot: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

महाराष्ट्राला दिलेला अजून एक शब्द पुर्ण..... बाणकोट प्रवेशद्वार सज्ज..... दुर्गार्पण सोहळा ३ एप्रिल २०२२ रविवारी सकाळी १० वाजता श्रीवर्धन विभाग दापोली खेड मंडणगड विभाग रत्नागिरी जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Bankot: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Hadsar: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

हडसर प्रवेशद्वार स्वराज्यास अर्पण...... सह्याद्री प्रतिष्ठान शिवजन्मभूमी

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Hadsar: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Jivdhan: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

किल्ले जीवधन प्रवेशद्वार दुर्गार्पण सोहळा आज उत्साहात पार पडला.. सह्याद्री प्रतिष्ठान शिरूर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Jivdhan: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Kothaligad: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

द्वितीय वर्षपूर्ती सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत उत्कृष्ट नियोजनाने लोकवर्गणीतून सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी संकल्पित केलेला कोथळीगड प्रवेशद्वाराचे सह्याद्रीच्या दुर्गसेवकांच्या साक्षीने , लोकार्पण जल्लोषात करण्यात आले. सह्याद्रीचे दुर्गसेवक सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा

Still from the official video

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Kothaligad: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Kothaligad: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

स्वराज्याचे प्रवेशद्वार || किल्ले कोथळीगड || रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील हा गड. आजवर ह्या गडाने सन २०१९ ह्या वर्षात दोन दुर्गार्पण सोहळे अनुभवले अन हा तिसरा सोहळा गडावर साजरा होत आहे. राज्यातील एकमेव ग जिथे आजपर्यंत ३ दुर्गार्पण सोहळे सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे साजरे झालेत. गडावरील प्रवेशद्वाराला दरवाजा बसविण्यात आला. दिनांक २९ डिसेंबर २०१९ रोजी त्याचा दुर्गार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या कर्जत विभागाच्या वतीने ह्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ह्यासाठी लागणारा सर्व निधी हा लोकसहभागातून उभारण्यात आला. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Kothaligad: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Gorakhgad: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

स्वराज्याचे प्रवेशद्वार || किल्ले गोरखगड || कल्याण नाणेघाट जुन्नर ते प्रतिष्ठान (पैठण) या सातवाहन कालीन व्यापारी मार्गावर देखरेख ठेवणारा, तसेच नवनाथ सांप्रदायातील गोरक्षनाथ यांच्या साधनेचे ठिकाण असलेला हा किल्ले गोरखगड. या गडावरील प्रवेशद्वारास लाकडी सागवानी कवाड दिनांक १८ ऑक्टोबर २०१८ रोजी विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे स्वराज्यासाठी दुर्गार्पण करण्यात आले. या दरवाजासाठी आलेला सर्व खर्च हा लोकसहभागातून निधी उभारून करण्यात आला आहे. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Gorakhgad: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Karnala: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

स्वराज्याचे प्रवेशद्वार ॥ किल्ले कर्नाळा ॥ मुंबई गोवा हायवे पासून हाकेच्या अंतरावर उभा असलेला अन शिवकाळातील अनेक घडामोडींची साक्ष देणारा हा किल्ले कर्नाळा. ह्या किल्यावरील प्रवेशद्वारास लाकडी सागवानी कवाड लोकसहभागातून सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे बसविण्यात आले. दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ रोजी हा दुर्गार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Karnala: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Sajjangad: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

स्वराज्याचे प्रवेशद्वार || किल्ले सज्जनगड || संत श्री रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली हि भूमी. ह्या गडावरील महादरवाजास लाकडी प्रवेशद्वार सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे बसविण्यात यावे. हि ल्पना मांडण्यात आली. त्यासाठी लागणारा सर्व निधी हा लोकसहभागातून उभारण्यात आला. तसेच येथील प्रवेशद्वारावर छत्रपतींच्या एकेरी नावाचा उल्लेख होता तोही बदलून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नामकरण करण्यात आले. या दुर्गार्पण सोहळ्यासाठी छत्रपती उदयनमहाराज भोसले स्वतः उपस्थित होते. हा दुर्गार्पण सोहळा प्रचंड गर्दीत दिनांक १५ सप्टेंबर २०१९ रोजी साजरा करण्यात आला. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Sajjangad: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Tikona: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

स्वराज्याचे प्रवेशद्वार ॥ किल्ले तिकोणा ॥ पवन मावळचा दुसरा मानबिंदू म्हणजेच किल्ले तिकोणा अनेक ऐतिहासिक घडामोडींची साक्ष देणारा हा किल्ले तिकोणा. या किल्याच्या बालेकिल्याकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या प्रवेशद्वाराला दिनांक ८ जून २०१८ रोजी लोकसहभागातून निधी उभारून सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे लाकडी सागवानी कवाड बसविण्यात येऊन त्याचा दुर्गार्पण सोहळा करण्यात आला. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Tikona: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Torna: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

किल्ले तोरणा (कानंद खोरे मावळ) सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या वतीने २.३ वर्षांपूर्वी ३१ मार्च २०१९ रोजी पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातील तोरणा किल्ल्यावर बिन्नी दरवाजास सागवानी प्रवेशद्वार बसवण्यात आले होते. ते आजही सुस्थितीत आहे. सार्थ अभिमान सह्याद्री प्रतिष्ठान बारा मावळ 👏

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Torna: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Sarasgad: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

सह्याद्री प्रतिष्टान खालापूर किल्ले सरसगड ⛳ प्रवेशद्वार पावसाळ्यात खराब होऊ नये म्हणून दोन्ही दरवाज्यांना वार्णीश आणि कीटक नाशक लावून पुन्हा प्रवेशद्वार चकचकीत करण्यात आले. (शाकारणी मोहीम) सहयाद्री प्रतिष्ठाण खालापूर विभाग 🚩 सह्याद्री प्रतिष्ठान खालापूर विभागाच्या वतीने मोहिमेस आलेल्या सर्व दुर्गसेवकांचे मनःपूर्वक आभार. 💐💐💐💐💐 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Sarasgad: gateway conservation · Photograph 1Sarasgad: gateway conservation · Photograph 2
Official Instagram account · Published

Tikona: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

सह्याद्री प्रतिष्ठान, मावळ तालुक्यातील तिकोना किल्ला वर सह्याद्रीच्या वतीने प्रवेशद्वार उभारण्यात आले होते, यांस पावसाळ्यापूर्वीची शाकारणी करत प्रवेशद्वारास पॉलिश करण्यात आले. सहभागी सर्व दुर्गसेवकांचे कौतुक 👏 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Tikona: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Tung: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

सह्याद्री प्रतिष्ठान, मावळ तालुक्यातील तुंग किल्ला वर सह्याद्रीच्या वतीने प्रवेशद्वार उभारण्यात आले होते, यांस पावसाळ्यापूर्वीची शाकारणी करत प्रवेशद्वारास पॉलिश करण्यात आले. सहभागी सर्व दुर्गसेवकांचे कौतुक 👏 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Tung: gateway conservation · Photograph 1
Official Instagram account · Published

Ratangad: gateway conservation

An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.

Read the original Marathi caption

सह्याद्री प्रतिष्ठान, नगर जिल्हा रतनगडावर सह्याद्रीच्या वतीने प्रवेशद्वार उभारण्यात आले होते, यांस पावसाळ्यापूर्वीची शाकारणी करत प्रवेशद्वारास पॉलिश करण्यात आले. सहभागी सर्व दुर्गसेवकांचे कौतुक 👏 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान

Sahyadri Pratishthan · Instagram — Visit official Instagram ↗
Ratangad: gateway conservation · Photograph 1Ratangad: gateway conservation · Photograph 2

Archive account · date not recorded

A gateway supported by public contributions

The presentation records installation of a wooden door with archaeological permission and contributions from people across Maharashtra. The open entrance and the installed door are shown together.

Full original account ↗
A gateway supported by public contributions · Photograph 1

Gorakhgad

This sequence follows the effort of carrying materials up the difficult approach through to the decorated gateway and the gathering at its dedication.

Full original account ↗
Gorakhgad · Photograph 1

Archive account · date not recorded

Karnala

Before-and-after views of the entrance are accompanied by a team photograph. Karnala is documented as an individual project in the gateway programme.

Full original account ↗
Karnala · Photograph 1Karnala · Photograph 2

Torna

A paired photographic record shows the stone-arched entrance and its installed wooden doors.

Full original account ↗
Torna · Photograph 1Torna · Photograph 2

Sajjangad

The Satara fort’s record pairs the entrance before and after the work with photographs of the dedication programme and its participants.

Full original account ↗
Sajjangad · Photograph 1Sajjangad · Photograph 2

Sarasgad

Volunteers transporting doors and materials show the practical effort behind the project. The archive also includes a before-and-after entrance comparison.

Full original account ↗
Sarasgad · Photograph 1Sarasgad · Photograph 2Sarasgad · Photograph 3
More photographs (2)
Sarasgad · Photograph 4Sarasgad · Photograph 5

Sinhagad

The gateway dedication at Sinhagad is recorded through views of the doors, their decoration and participants at the ceremony.

Full original account ↗
Sinhagad · Photograph 1Sinhagad · Photograph 2

Kothaligad

A photographic record of the gateway dedication, dated 29 December 2019 in the presentation.

Full original account ↗
Kothaligad · Photograph 1

Harihar

The gateway comparison is accompanied by photographs of volunteers on Harihar’s steep approach, connecting the finished entrance with the effort required to reach it.

Full original account ↗
Harihar · Photograph 1Harihar · Photograph 2

Hadsar

The photographic panel brings together Hadsar’s timber doorway, the transport of materials and its dedication.

Full original account ↗
Hadsar · Photograph 1

Archive account · date not recorded

Rajgad

The presentation records measurements and proposed door layouts for Pali Darwaza and the citadel entrance, alongside photographs of Rajgad’s gateways. These historic proposals describe the planning at that time.

Full original account ↗
Rajgad · Photograph 1Rajgad · Photograph 2Rajgad · Photograph 3
More photographs (1)
Rajgad · Photograph 4

Photography credits

Heritage photographs illustrate the forts; they do not depict the organisation’s campaigns.

Lohagad — Roadtripper876 · CC BY 4.0

Raigad — Aatakke · CC BY-SA 3.0

Images resized; displayed with responsive cropping and overlays. Film thumbnail: Sahyadri Pratishthan Official / YouTube. Logo supplied by Sahyadri Pratishthan. Founder and historical archive photographs supplied in the organisation’s presentation; original visible photographer credits are retained.