संस्थे बद्दल माहिती

सह्याद्री प्रतिष्ठान 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने आणि सहवासाने पुनीत झालेल्या महाराष्ट्रातील गडकोट म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीची आभूषणे व महाराष्ट्राच्या अस्मितेची प्रतीके म्हणावी लागतील कधी काळी वैभवाच्या आणि कीर्तीच्या शिखरावर विराजमान असलेली हि दुर्ग संपदा आज अडगळीला दुर्लक्षित अवस्थेत पडलेली उन-पावसाशी सामना करत शेवटचा घटका मोजीत आहे आणि हे असेच चालू राहिले तर हे ऐतिहासिक वैभव उद्या आपण गमावलेले असेल व त्यासाठी आजच्या पिढीला इतिहास व उद्याची पिढी केव्हाच माफ करणार नहि.
स्वतः शिवरायांनी किल्ल्यांचे महत्त्व खालील शब्दात वर्णन केले आहे.

“जैसे कुळबी शेतास माळा घालून शेत राखितो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. तारवांस खीळे मारून बळकट करितात तशी राज्यास बळकटी किल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरून जाईल. आपणास धर्मस्थापना व राज्यसंपादन करणे होय. सर्वांस अन्न लावून, शत्रुप्रवेश न होय ते किल्ल्यांमुळे होते. सर्वांचा निर्वाह आणि दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे-जुने तीनशेसाठ किल्ले हजरतीस आहेत. एक-एक किल्ला वर्ष-वर्ष लढला, तरी तीनशेसाठ वर्षे पाहिजेत.”

आणि पुढच्या पन्नास वर्षात सह्याद्रीने तेच अनुभवले.

‘थोरले महाराज यांनी हे राज्य गडावरुन निर्माण केले’ आणि ‘गड होते म्हणुन राज्य मात्र अवरिष्ट राहिले’ या आज्ञापत्रातील २ वाक्यांवरुन शिवकाळातील गडांची महती स्पष्ट होते. रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात ८ व्या प्रकरणात किल्ल्यांचे महत्त्व, त्यांची रचना व व्यवस्था यावर उहापोह केला आहे. त्यात म्हटले आहे की “गड़कोट हेच राज्य, गड़कोट म्हणजे राज्याचे मुळ, गड़कोट म्हणजे खजिना, गड़कोट म्हणजे सैन्याचे बळ, गड़कोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गड़कोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गड़कोट म्हणजे सुखनिद्रागार किंवा गड़कोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण.”

अशा या राकट देशाचा प्रतिनिधी म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीत कोठेही उभे राहून नजर फिरवली तर, दर चार-दोन शिखरांआड एखादं शिखर तटबुरुजांचं शेला-पागोटे चढवून उभं राहिलेलं आढळतं. यातील बहुतेक दुर्गांनी श्रीशिवछत्रपतींची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे. त्या शिवस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची धारातीर्थे आहेत. या गड- कोटांची रक्षणाची जबाबदारी हि आजच्या पिढीची आहे.

आपल्या अवषेशातून छत्रपती शिवराय व मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे गडकोट संरक्षण होणे काळाची गरज असून त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे.
स्वराज्य आणि गडकोट यांना वेगळे करता येत नाही इंग्रजांच्या भारतातील शिर्कावानंतर त्यांनी सर्वात पहिल्यन्दा गडकोट उध्वस्त केले गडकोटांकडे जाणार्या वाटा पुसत सामार्थ्यशाली गडकोट अडगळीला टाकले.

स्वातंत्र्य नंतरही या गडकोटांचे दुर्दैव संपलेले नाही शिवरायांच्या सामर्थ्याचे प्रतिक असलेले गडकोट आज आपल्या उरल्या सुरलेल्या अवशेशांसह उन पावसालाल तोंड देत शेवटचे श्वास घेत आहेत.
महाराष्ट्रातले बहुतेक किल्ले पुरातत्व विभागाच्या आणि वन विभागाच्या ताब्यात आहेत खरतर या महाराष्ट्राच्या वैभवाची देखभाल , दुरुस्ती व संवर्धनाची जबाबदारी या विभागाची म्हणजेच शासनाची आहे पण शासनाच्या उदासीन व अस्पष्ट धोरनां मुळे या गडकोटांची उपेक्षा संपलेली नाही काही अपवाद वगळता हौसे नौसे पर्यटक आपल्या बेताल वागण्याने गडकोटांचे विद्रुपीकरण करतात लोकवस्ती जवलचे किल्ले तर आणखीनच दुर्दैवी कधी काळी शूरवीर मावळ्यांचा सहवास लाभलेले हे किल्ले दारूड्यांचे , जुगार्यांचे अड्डे बनले आहेत या सर्वांचा बंदोबस्त करण्याची शासनाकडे हिम्मत नाही कि इच्छा नाही ? तेच जाने !
महाराष्ट्रातील गडदुर्गांच्या संवर्धानासाठी शासना बरोबरच समाजाला जागे करण्यासाठी गेले तीन वर्षापासून ” शिवदुर्ग अस्मिता आंदोलन ” सातत्याने लोकशाही पूरक आंदोलनच्या सहायाने दुर्ग संवर्धानाची शासनाकडे आग्रही मागणी करत आहे.

गड कोटांवर जाऊन संवर्धन करायचे म्हणजे नक्की काय करायचे हा हि एक प्रश्न आजच्या पिढी समोर आहे आज अनेक दुर्गसंवर्धन संस्था किल्ल्यावर दुर्गसंवर्धनाचे काम करत आहेत त्या मध्ये देखील तुम्ही सामील होऊ शकता
सह्याद्री प्रतिष्ठानने आत्तापर्यंत १५८ दुर्ग संवर्धान मोहिमा अनेक गडकोटांवर घेतल्या आहेत त्यामध्ये चांगल्या प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध करून गड कोटांचे संवर्धन केले आहे. सगळ्यांनी जर विचार केला तर त्यानाही अश्या प्रकारचे संवर्धन गड कोटांवर करता येईल
शिवजयंतीला सक्रीय होणारे महाराष्ट्रात लाखो प्रतिष्ठान आणि संघटना आपल्याला सापडतील.. पण वर्षभर शिवकार्यासाठी झटणाऱ्या संघटना हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच आहेत त्यांच्यातीलच एक पण तरीही सर्वांपेक्षा नक्कीच वेगळे असे हे एकच ‘सह्याद्री प्रतिष्ठान’. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जन्माने नाहीतर कार्याने मोठे झाले.. अश्या विचारांना धरून चालणारी हि संघटना आहे. छत्रपती शिवराय त्यांच्या विचारातून आणि कार्यातून अजून हि जिवंत आहेत पण वाईट याचे वाटते कि इथल्या प्रत्येक माणसाची मने मेलेली आहेत.. शिवरायांचे प्रत्येक कार्य हे मरगळलेल्या मराठी माणसाला प्रेरणा देतं.. आणि त्याच विचारांवर त्यांची प्रेरणा घेऊन आज ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ वर्षभर शिवरायांच्या कार्य घरोघरी पोहचविण्याचा प्रयत्न करतेय !
सह्याद्री प्रतिष्ठानकडून वर्षभर राबविले जाणारे उपक्रम

१) सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवर आतापर्यंत २५० पेक्षा जास्त दुर्गसंवर्धन मोहिमा राबविल्या आहेत या मोहिमे मधे पुढील उपक्रम राबविले गेले आहेत –
Ø किल्यावर जाणार्या वाटा दुरुस्त करने ,
Ø किल्ल्यावर असणार्या प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या दारूच्या बाटल्या गोळा करणे ज्या मुळे किल्ल्यच्या प्रदुर्षानाला आळा बसवने.
Ø किल्ल्याच्या भिंतीवर, तटावर , बुरुजांवर वाढलेली झाडे झुडपे काढून टाकणे त्याच्या मुळांवर एसिड ओतून ती समूळ नष्ट करने.
Ø किल्ल्यावर असणार्या पाण्याच्या टाक्या साफ करणे , जेणे करून किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल.
Ø किल्ल्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या तोफा , तोफगोळे जुन्या वस्तूंचे अवशेष व्यवस्थित ठेवणे.
Ø किल्य्यावर जाताना किल्ल्याचे दिशादर्शक माहितीदर्शक फलक लावणे जेणेकरून लोकांना किल्ल्य्बाबत माहिती मिळेल.
Ø तटावरून, बुरुजावरून, निखळलेले दगड परत होत्या त्या ठिकाणी व्यवस्थित बसवने.
2) छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार घराघरात व्हावा यासाठी दरवर्षी ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारीला किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड असा ५ दिवसांच्या भव्य पालखी सोहळयाचे आयोजन करून त्यावर आधारित शिवरथ या माहिती पटाची निर्मिती केली जाते. महाराष्ट्रभर या सोहळ्याचा प्रसार होण्यासाठी व्हिडिओ सीडीचे मोफत वितरण केले जाते. या वर्षी शिवरथ यात्रेस पाच वर्ष पूर्ण झाली आहेत.
३) छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार घराघरात व्हावा यासाठी दरवर्षी १४ में या त्यांच्या जयंतीच्या दिवशी स्वाभिमान यात्रा पिंपरी-चिंचवड ते किल्ले पुरंदर अशी काढली जाते.
४)प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सततचा पाठ पुरावा म्हणून पत्र, निवेदने यामार्फत सरकारकडे केला जातो.
५) महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या बाबतीत उदासीन पुरातत्व खाते तसेच झोपेचे सोंग घेणारे महाराष्ट्र सरकार यांना जागे करण्यासाठी शिवदुर्ग अस्मिता आंदोलनाच्या माध्यमातून निदर्शने, उपोषणे, जेल भरो, रास्ता रोको अशा प्रकारच्या आंदोलनातून जनजागृती करण्याचे प्रयत्न केले जातात.
६)महाराष्ट्रातील ४०० किल्ल्यांचे संवर्धन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून सह्याद्री प्रतिष्ठान कायदेशीर लढा देत आहे.
७) सह्याद्री पुरस्कार, शिवदुर्ग अस्मिता पुरस्कार, शिवरथ पुरस्कार, असे पुरस्कार दरवर्षी शिवकार्य, दुर्ग संवर्धन करणार्या संघटना, व्यक्ति, याना देऊन त्यांचा गौरव केला जातो.
८) महाराष्ट्रातील ४०० गड-किल्ल्यांच्या ४५,००० फोटोंचे लिम्का बुक ऑफ रेकोर्डस मध्ये नोंद असलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन सर्वाना मोफत दाखवले जाते.
९)शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींसाठी छत्रपती शिवरायांची महती पटवून देण्यासाठी प्रसिद्ध इतिहासकारांची व्याख्याने आणि मार्गदर्शन, महाराष्ट्रभर पोवाडे व मर्दानी खेळांचे आयोजन असे विविध प्रकल्प प्रतिष्ठान राबवीत आहे.
१०)गड किल्ल्यांची माहिती असलेली www.SahyadriPratishthan.com हि वेबसाईट तसेच विविध पुस्तके प्रतिष्ठान कडून प्रकाशित करून ती दुर्गप्रेमींना विनामूल्य वितरीत केली जातात.
११)सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन प्रतिष्ठानकडून आरोग्य, नेत्रदान शिबिर, रक्तदान शिबिर , शैक्षणिक व पर्यावरण विषयक उपक्रम राबविले जातात.
१२) सामाजिक जाणीवेतून वर्षातून ४ वेळा रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते तसेच सर्व सभासदांची रक्तगटाची यादी तयार करून तातडीच्या प्रसंगी रक्ताचा पुरवठा केला जातो.
१३) इतिहासाची माहिती लोकांना होण्यसाठी सर्व शाळांमधून मोफत स्लाइड शो च्या माध्यमातून गडकोटांची माहिती पुरवली जाते.
१४) ऐतिहासिक शस्त्रे, वस्तू , प्रदर्शने भरउन लोकांना मोफत त्याची माहिती पुरवली जाते.
१५) किल्ल्यावर जाणार्या सहलींना अथवा ग्रुपला किल्ल्याची माहिती देण्यसाठी मोफत मार्गदर्शक पुरवणे.
१६) इतिहास अभ्यासक अश्या नव्या पिढीसाठी जुनी सहजा सहजी न मिळणारी अशी ५०० च्या वरती जुनी पुस्तके PDF स्वरुपात मोफत उपलब्ध करून देण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत केले जात आहे.

या वर्षीची यशस्वी कार्याची उदाहरणे
१) छत्रपति संभाजी महाराजांची जन्मनोंद शालेय पाठ्यपुस्तकात होण्यासाठी यशस्वी आंदोलन.
पाठ्यपुस्तकात छत्रपति संभाजी महाराजांची जन्मनोंद करणार असल्याचे लेखी पत्र मिळाले.
२) महाराष्ट्रातील ४०० किल्ल्यांचे संवर्धन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेच्या निकालात ४७ करोड़ रुपयांचा निधि मंजूर
३) सिंहगड़ किल्यावर कल्याण दरवाज्यासाठी यशस्वी आंदोलन, मुख्यमंत्री विशेष निधीतून १.७५ करोड़ रुपये निधि मंजूर करण्यात आला.
४) महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच गड़ किल्ल्यांवर पोवाड्याची निर्मिति व प्र नितिन बांनगडे पाटिल यांचे दुर्ग संवर्धन या विषयवार व्यख्यानाच्या सी डी ची निर्मिति.
५) राज्यस्तरावर सर्व संस्थाना एकत्रित आणून राज्यस्तरीय दुर्ग संवर्धन समिती स्थापन करण्याचे कार्य संस्थे मार्फत केले गेले आहे.