पाथरी किल्ला
किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
जिल्हा: परभणी
तालुका: पाथरी
पाथरी हे पांडवाच्या वास्तव्य असलेले क्षेत्र असून त्याचे जुने नाव पार्थपूर असे आहे.पाथरीहा किल्ला भग्नावस्थेत असून किल्ल्यावर दोन विहारी आहेत, किल्ल्यांच्या दोन्ही प्रवेश द्वाराचे काही भाग शिल्लक आहेत. जवळजवळ सहाशे वर्षापुर्वी किल्ल्यावर असलेल्या वास्तूचे शाह हमीद उद्धीम दर्गा यात रुपांतर करण्यात आले आहे, असा उल्लेख महाराष्ट्र शासनाच्या गझेट मध्ये आढळतो.विशेष म्हणजे दर्ग्याचा आकार अष्टकोनी आहे, दर्गाला बारा खांब असून त्यावर साडेनऊ मीटर उंचीचा घुमट आहे. दर्ग्याच्या चारही कोपऱ्यात प्रचंड खांब आहेत, हे खांब आणि घुमट यांचे काम अतिशय सुबक आहे. आतील बाजूवर सुंदर नक्षीकाम असून त्यावर हिंदू शिल्पकलेची बरीच छाप पडलेली दिसते. दर्ग्यास चार प्रवेशद्वार असून त्यापैकी तीन बुजलेले आहेत दर्ग्याभावती भिंतीमध्ये सर्वत्र कानोडे आहेत. सध्या किल्ल्यावर लोकांनी वस्ती केल्यामुळे किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.