येसाजी कंक

Blog page

येसाजी कंक

जेव्हा छत्रपती शिवराय हे राज्याभिषेकानंत र दक्षिण दिग्विजयासाठी गेले होते त्यावेळी आदिलशाही संपवण्यासाठी त्यांनी कुतुबशहाशी हातमिळवणी केली होती. कुतुबशहाने भेटीच्या वेळी विचारले की”मराठा सैन्यामधे हत्ती कां नसतात..?”त्याबदल्यात शिवरायांनी उत्तर दिले होते की”स्वराज्याच्या सैन्यातील प्रत्येक मावळा हा हत्तीवर भारी पडू शकतो.”तेव्हा येसाजी कंक यांनी आपल्या राजाचा शब्द खरा करून दाखवण्यासाठी म्हणून आखाड्यात उडी घेतली. त्यांनी हत्तीशी एकट्याने झुंज दिली व हत्तीस पळवून लावले.

येसाजी शांतपणे मैदानातून वर आला.शामियान्यात येवून त्याने मुजरा केला.घामाने डवरलेल्याराजांनी येसाजीला मिठी मारली,आपल्या हातातील रत्नखचित सलकडी येसाजीच्या हाती घातली.काही न बोलता राजे परत बसले.तानाशहानी येसाजीवर देणग्यांची खैरात केली.येसाजी कुतुब्शाहीच्या दरबारी राहील,तर पंचहजारांची मनसब द्यायला कुतुबशहा तयार झाले.येसाजी मुजरा करून म्हणाला,”मी महाराजांचे अन्न खातो.ते आपलच आहे त्यापेक्षा जहागिरी का जास्त आहे?”त्या उत्तराने तानाशहा आणखीन खुश झाले.ते राजांना म्हणाले,’महाराज,हा तुमचा माणूस आम्हांला द्या’राजांचा हात गळ्यातल्या नवरत्नांच्या कंठ्यांशी गेला. राजांनी हसून विचारले,”या कंठ्यातलएखाद रत्न निखळल,तर काय होईल?’कंठ्याची शोभा जाईल!'”हजरत आम्ही कंठा वापरतो,तो हौसेसाठी नाही;न ऐश्वर्याच्या प्रदर्शनासाठी.ह ा कंठा या माणसांची आठवण आहे.यातला प्रत्येक माणूस हा आमच्याच तोलामोलाचा आहे.आमचे राज्य हत्तीच्या बळावर नव्हे,यांच्या आधारावर सुरक्षित आहे.एक एक माणूस मिळवून माळेस मनी जोडले आहेत.ते मनी कसे काढता येतील?”तानाशाह निरुत्तर झाले.त्यांना काही तरी एकदम आठवले.ते राजांच्याकडे वळून विचारते झाले,’एक विचारू?”संकोच कसला?”जेव्हा तुमचा माणूस हत्तीशी झुंजत होता,तेव्हा आपली नजर खाली का वळली होती?आपल्या कपाळी घाम का आला होता?असल्या झुंजीची भीती वाटते?'”आपका कहना दुरुस्त है.’राजे म्हणाले.”हि जीवाला जीव देणारी माणसं,वेळ का सांगून येते?घात,अपघात होतात.चुकून पाऊल फसतं.करमणुकीपाय ी असे मोहरे खर्ची टाकण्याची सवय आम्हांला नाही.आपल्या इच्छेखातर आम्ही येसाजीला पाठवला;पण तो माघारी येईपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता.”