ढाकोबा किल्ला

किल्ल्याची उंची: ३९०० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
चढाई श्रेणी: मध्यम
डोंगररांग: भीमाशंकर
जिल्हा: पुणे

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर डोंगररांगेतील ढाकोबा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
जुन्नर परिसरातील घाटाच्या अगदी कडेवर मीना मावळ आंणि कुकड मावळातील अणे-माळशेज डोंगररांगेतील हा सर्वोच्च जुळा किल्ला. दुर्ग आणि ढाकोबा या जुळ्या किल्ल्यांच्या उभारणीमागे घाटवाटांवर लक्ष ठेवणे हा उद्देश असे.

जुन्नर आपटाळे रस्त्यावर एक उच्छल नावाचे लहानसे खेडे आहे. १९३४ ते १९४४ या स्वातंत्र्यपूर्व काळात या गावात कोंडाजी नवले नावाचा भारतीय रॉबिनहूड राहत असे. तो आणि त्याचे साथीदार अन्यायी श्रीमंत जमीनदारांना लुटून त्यांची संपती गरीब जनतेत वितरित करत असत. त्याची तक्रार जमीनदारांनी ब्रिटिश राजवटीकडे केली होती. पण सामान्य जनतेच्या पाठिंब्यामुळे तो पकडला गेला नाही. आजही स्थानिक जनतेत त्याची स्तुतिपर कवने गायली जातात. ढाकोबाच्या वाटेवर या गावातील त्याच्या घरीदेखील भेट देता येते.

नाणेघाट आणि जीवधनच्या दक्षिणेकडे एक उत्तुंग पर्वत रांग दिसून येते. त्यामध्येच एक डोंगर म्हणजे ‘ढाकोबा’ किल्ल्याची एक बाजू म्हणजे सरळसोट सुटलेला कडा. तो सरळ खाली कोकणातच उतरतो. याच ढाकोबाच्या सरळ रेषेत असणारा दुसरा किल्ला म्हणजे ‘दुर्ग’ दुर्गमता आणि विरळवस्ती हे या भागाचे वैशिष्ट्य. येथे ग्रामस्थांची आपल्या प्राथमिक गरजा भागवतांनाच मारामार होते तर वीज-शिक्षण तर दूरच येथील मुख्य व्यवसाय शेती काही ठिकाणी दुधाचा व्यवसाय पण केला जातो.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
या गडावर गड किल्ला असण्याचे कोणतेही अवशेष नाहीत मात्र टेहळणीसाठी यांचा उपयोग केला जात असावा. ढाकोबा किल्ल्यावरून नाणेघाट जीवधनची मागची बाजू, दाऱ्याघाट असे कोकणचे विहंगम दृश्य दिसते.

दुर्ग: दुर्गादेवीच्या मंदिरापासून किल्ल्यावर पोहचण्यास २० मिनिटे लागतात. येथून गोरखगड, सिद्धगड आणि मच्छिंद्रगड असा सर्व परिसर दिसतो.

गडावर जाण्याच्या वाटा
जुन्नर – आपटाळे- आंबोली मार्गे येणाऱ्या वाटेने प्रथम ढाकोबा आणि नंतर दुर्ग करता येतो. भीमाशंकर-अहुपे मार्गे येणाऱ्या वाटेने प्रथम दुर्ग आणि नंतर ढाकोबा करता येतो.

) जुन्नरआपटाळे आंबोली मार्गे
जुन्नर वरून आंबोली गावात येण्यासाठी थेट बस आहे हे अंतर साधारण दीड तासाचे आहे. आंबोली गावातूनच ढाकोबाचे दर्शन होते. गावातून एक वाट सरळ समोरच्या पठारावर जाते. वर जातांना वाटेत तीन गुहा लागतात. गावापासून पठारावर येण्यास दीड तास पुरतो या वाटेतूनच एक वाट मध्ये उजवीकडे दुभागते ती दाऱ्याघाटा कडे जाते. एकदा पठारावर पोहचल्यावर अनेक ढोरवाटा लागतात. पण त्यामध्ये ठळक मात्र दोनच वाटा आहेत त्यातील दोनच वाटा आहेत. त्यातील एक वाट डावीकडे जाते तर दुसरीवाटा उजवीकडे थेट धाकोबाच्या पायथ्यालगत पुढे जाते आणि पुन्हा ५ मिनिटांनी डावीकडे डोंगरधारेवरून खाली उतरते हीच वाट पुढे दुर्गकडे जाते. ही वाट ज्या ठिकाणाहून खाली वळते तेथूनच एक वाट सरळ डोंगरावर म्हणजेच धाकोबावर जाते. येथून गडमाथा गाठण्यास अर्धा तास पुरतो.

) भीमाशंकरअहुपे मार्गे वर सांगितलेल्या दुर्गकडे जाणाऱ्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक वाट डावीकडे जंगलात वळते. ती धाकोबाच्या मंदिराकडे जाते तर सरळ जाणारी वाट पुढे अर्ध्या तासात एका ओढ्यापाशी येऊन थांबते. या ओढ्याला बारामही पाणी असते. याच वाटेने पुढे हातवीज च्या मार्गे निघायचे. थोडे फार चढ‍उतार आहेत वाटेला अनेक उपवाटा फुटलेल्या आहेत पण आपण ठळक वाट सोडायची न्ही. पुढे एक तासाच्या चालीनंतर दुर्ग किल्ल्याचे दर्शन होते. पुढे एका पठारावर येऊन वाट दुभागते. डावीकडे जाणारी वाट हातवीज आणि दुर्गवाडीकडे जाते तर उजवीकडे जाणारी वाट दुर्गादेवीच्या मंदिरात जाते. येथून दुर्गादेवीच्या मंदिरात जाण्यास अर्धा तास पुरतो. दुर्गादेवीच्या मंदिरापासून किल्ल्यावर जाण्यास ठळक वाट नाही. वाट आपणच आपली शोधून काढायची.

राहण्याची सोय: किल्ल्यावर नाही. धाकोबाच्या पायथ्याशी असणाऱ्या मंदिरात १५ जणांची राहण्याची सोय होते. दुर्गच्या पायथ्याशी असणाऱ्या दुर्गामंदिराच्या मंदिरात ५ जणांची राहण्याची सोय.
जेवणाची सोय: स्वतः करावी.
पाण्याची सोय: ढाकोबा आणि दुर्गादेवीच्या मंदिरात बाजूलाच पिण्याच्या पाण्याची तळी आहेत.