जुन्नर किल्ला / गढी
त्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला जुन्नर किल्ला गढी स्वरूपाचा असून शिवकालीन व्यापारपेठ आणि मूळ शहर यांना संरक्षण देण्यासाठी बनवण्यात आला होता. जुन्नर शहरात एसटी स्थानका समोरच जुन्नर किल्ला असून देखील फारसा प्रचलित नाही.

सरकारी कचेऱ्या, न्यायालय, व्यापारी दुकाने यांच्या अतिक्रमणात किल्ल्याचे वास्तव्य दडून गेले आहे. किल्ल्याचा परिसर मोठा असून बहुंतांश भाग पडलेला आहे पण बुरुज चांगल्या स्थितीत आहेत.

शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी जाणार्या दुर्ग प्रेमींनी या किल्ल्याला अवश्य भेट द्यावी.