किल्ले मंडणगड व किल्ले बाणकोट तोफगाडे लोकार्पण सोहळा

किल्ले मंडणगड व किल्ले बाणकोट तोफगाडे लोकार्पण सोहळा दी.७/१२/२०२०

अथक प्रयत्नांनी काम फत्ते झाल्यावर आनंद चेहेऱ्यावर झळकतोच…
किल्ले मंडणगड आणि किल्ले बाणकोट एकाच दिवसात दोन्ही तोफ गाडे वर नेऊन त्यावर तोफा ठेवण्यात आल्या …पण काम ६/१२/२०२० सकाळी ११ वाजता चालू झाले ते पूर्ण झाले ७/१२/२०२० पहाटे ५ वाजता. . ४ टन तोफ २५ फूट बुरुजावर नेऊन गाड्यावर ठेवणे खाऊ नाही मित्रानो… जे साक्षीदार होते त्या सर्वांना मानाचा मुजरा….
लगेच न झोपता दुपारच्या कार्यक्रमाची तयारी ते ही चेहऱ्यावर कुठलाही थकावा झोप न येता हीच तर खरी ऊर्जा आहे सह्याद्री प्रतिष्ठान मधून मिळणारी , सुंदर कार्यक्रम नियोजन बद्ध आणि अभूतपूर्व अशी महिला आणि गावकरी यांची हजेरी…. डोळे दिपवणारा दुर्गारपण सोहळा…
प्रमुख अतिथी ज्यांनी तोफ गाड्यांचा निधी दिला त्यांच्यातील एका प्रतिनिधीचे (मुंबई हायकोर्ट मधील सरकारी वकील ॲड. श्रीकांत गावंड)सुंदर भाषण त्यात त्यांनी केलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र च्या कामाचे कौतुक या सर्व गोष्टींमुळे थकवा पूर्ण गेला
आता आतुरता विशाळगड आणि१३ डिसेंबर किल्ले हडसर २० डिसेंबर २०२० सोहळ्याची…
जय शिवराय

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र™
घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा