दि.११-१२-२०१७
सह्याद्री प्रातिष्ठानच्या कारवाईला यश
दि.१०-१२-२०१७ रोजी सह्याद्री प्रातिष्ठानची टीम शिवडी किल्ला पाहणी दरम्यान गेली असता. किल्यासमोरील गिरनार सामुदायिक शौचालयाच्या भिंतीवर शिवडी किल्याचे चित्र आणि किल्याच्या प्रवेशद्वाराचे चित्र काढण्यात आले होते. सदर गोष्टीची तक्रार स्थानिक नगरसेवक श्री सचिन पडवळ यांच्या निदर्शनास आणली गेली आणि वडाळा पोलीस स्थानकात याची तक्रार नोंदवण्यात आली. स्थानिक नगरसेवक श्री सचिन पडवळ यांनी या विषयावर दिलगिरी व्यक्त केली आणि तात्काळ कारवाई केली तसेच आता *तेथील चित्र खोडण्यात* आले आहे.

-: विशेष आभार :-
१.श्री परशुराम कार्यकर्ते सर(वरिष्ठ पोलीस निरीक्षक,वडाळा पोलीस स्थानक)
२.श्री सचिन पडवळ(स्थानिक शिवसेना, नगरसेवक)

!! दुर्ग संवर्धन विभाग !!
सह्याद्री प्रातिष्ठान,महाराष्ट्र राज्य
(घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा)