नारायणगड

नारायणगड हा किल्ला नारायणगाव शहर, जुन्नर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ५०च्या पुर्वेला आणि नारायण गावाच्या उत्तर दिशेला आहे.
या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते असे सांगितले जाते. नारायणगड हा एक ऐतिहासिक गड आहे, गडावर जिवंत पाण्याच्या टाक्या आहेत. हा किल्ला टेहळनीचा गड म्हणून प्रसिद्ध होता. या गडावर दसरा व नागपंचमी सणानिमित्त गावकरी मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे करतात.