वाघेरा किल्ला – Vaghera Fort
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: त्र्यंबकेश्वर
श्रेणी: मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: त्र्यंबकेश्वर
म्हसरूळकडून एक रस्ता थेट वाघेरा गावापर्यंत जातो. वाघेरा हे घाटमाथ्यावरचं गाव आहे. गावाच्या समोरच एक मोठा बंधारा व जलाशय आहे. जलाशयाच्या पाठी उभा आहे उंच वाघेरा. वाघेऱ्याचे कडे थेट घाटाखाली उतरलेले आहेत. धरणाच्या पाण्यावर व सुपीक जमिनीवर शेती करणाऱ्या गावकऱ्यांना वा