पेमगिरी किल्ला / भीमगड / शाहगड

पेमगिरी किल्ला / भीमगड / शाहगड
पेमगिरी किल्ला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आहे.

वैशिष्ट्ये
पेमगिरीचा किल्ला म्हणून ओळखला जाणारा भीमगड किंवा शाहगड इ.स. २०० मध्ये यादव राजांनी बांधला. या किल्ल्यावर पेमादेवीचे मंदिर असून पाण्याची टाके आहेत. दिल्लीचा मुघल सम्राट शाहजहान आणि विजापुराची आदिलशाही या दोन सत्तांनी मिळून निजामशाही संपवली, त्यावेळी मूर्तझा या अल्पवयीन असलेल्या निजामशाहीच्या वारसदाराला गादीवर बसवून मराठा सुभेदार शहाजीराजे भोसल्यांनी पेमगिरीच्या शाहगडावरून ३ वर्षे राज्यकारभार चालवला.
पेमगिरी गावाजवळ जुन्याकाळी चुन्याच्या खानी प्रसिद्ध होत्या. त्याकाळी चुन्यात इथल्या येळुशीच्या दऱ्यातील ‘पेमगिरी’ कंद चुना प्रसिद्ध होता.
पेमगिरी गावात एक जुनी पायऱ्यांची विहीर आहे. तीत एक शिलालेखही आहे.
गावाच्या शेजारी १.५ हेक्टर आकाराचे एक प्राचीन प्रसिद्ध वडाचे झाड आहे.
जाण्यासाठी संगमनेर- अकोले रस्त्यावरुन कळस गावापासून १० किलोमीटर.