दातिवरे किल्ला – Dativare Fort

दातिवरे किल्ला – Dativare Fort

किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
चढाई श्रेणी: मध्यम
जिल्हा: ठाणे
तालुका: पालघर

ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यात समुद्र किनारी वसलेले दातिवरे गाव, पश्चिमेला वैतरणा नदी आणि पूर्वेला अथांग समुद. येथील दातिवरे किल्ला तसा अपरिचित म्हणावा लागेल. दातिवरे किल्ल्यापासून केवळ १०-१५ मिनिटांच्या अंतरावर असलेली दीडशे फूट उंचीची दुर्लक्षित डोंगरी.

ठाणे जिल्ह्यात असलेल्या किल्ल्यांची अधिकृत संख्या ५५ आहे. गढी वा किल्ले याबाबत मतमतांतरं असले तरीहि इतिहास संशोधक आप्पा परब यांच्यामते मात्र हा आकडा ७० च्या घरात जातो. तसे संदर्भही त्यांनी दिले आहेत. महिकावतीच्या बखरीमध्ये वैतरणा नदी आणि हिराडोंगरीचा नामोल्लेख असल्याचं आढळते. या डोंगरीला दांडामित्रियं असंही नाव दिलेलं आढळतं.

इतिहास
दातिवरे किल्ला पोर्तुगीजकालीन असल्यामुळे किल्ल्याच्या आसपास इतरही गढीवजा किल्ले असण्याची शक्यता होती. कारण पोर्तुगीज किल्ल्याच्या रक्षणार्थ खाडीच्या आसपासच्या प्रत्येक मुखावर, पाच-सहा ठिकाणी अशा गढ्या बांधत. चिमाजी अप्पांनी वसई ताब्यात घेताना दातिवऱ्याचा उल्लेख केला. हे सैन्य माहीमच्या खाडीतून वसईत आलं. त्यावेळी त्यांनी दातिवऱ्याच्या खाडीलगत थांबा घेतला. इथे मराठ्यांचं सैन्य तब्बल ३८ हजार इतकं होतं. य.न. केळकर यांच्या लिखाणात हा संदर्भ आढळतो. केवळ किल्ल्यावर इतके लोक राहणं शक्य नाही. पण शेजारील डोंगरीचा वापर केला गेला असण्याची दाट शक्यता आहे.

किल्ल्यावर पाहण्यासारखे
दातिवरे किल्ल्याशेजारील डोंगरीवर सहा पायऱ्यांसह एक पाण्याचं टाकं, विवरं आणि तीन गुहा आहेत. दीडशे फुटांच्या या डोंगरीवरून अर्नाळ्याचा बुरूज थेट दिसतोच. शिवाय जीवधन किल्ला, भवानगड, अशेरीची रांगही दिसते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, वैतरणा नदीचं संपूर्ण पात्र इथून दिसतं. त्यामुळे ब्रिटिशकालीन व्यापारावर नजर ठेवता येण्यासाठी याचा वापर होत असावा.
या डोंगरीवरच्या दगडामध्ये किमान पाच रंग दिसतात. किल्याच्या दुरवस्थेकडे पाहता येथील रहिवासी लोक बांधकामासाठी दगड घेऊन जात असणार याची कल्पना येते.

Leave a Comment

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>