रत्नदुर्ग स्वच्छता मोहीम

आज दि. 1ऑक्टोबर रोजी
सह्याद्री_प्रतिष्ठान_महाराष्ट्र (रत्नागिरी विभाग )आणि कोकण_समृद्धी_फाऊंडेशन यांकडुन किल्ले_रत्नदुर्ग_स्वच्छता_मोहीम घेण्यात आली

मोहीमेची सुरुवात दरवेळी प्रमाणे #भगवती_देवी आणि #छत्रपती_शिवाजी_महाराज यांच्या मुर्तीला वंदन करुन झाली. मोहीमेमध्ये किल्ल्याच्या आवारातील प्लॅस्टीक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या तसेच खाद्यपदार्थांची वेष्टने उचलुन परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहीमेमध्ये दारुच्या बाटल्यांचे प्रमाण आधीच्या काही मोहीमांच्या तुलनेत कमी झालेले निदर्शनास आले

या मोहीमेमध्ये सह्याद्री प्रतिष्ठान आणि कोकण समृद्धी फाऊंडेशन या संस्थांचे सभासद तसेच नंदन रा कुळकर्णी, नंदकुमार साळवी, नयन चांदोरकर, शुभम भुवड, कमिटी सदस्या समिधा माळी, तालुकाउपाध्यक्ष अमृत गोेरे, गुरु पवार, अथर्व साळवी यांचा सहभाग होता.

 

सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र

घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा

 


1 Comment

Punam Raskar · October 29, 2018 at 5:46 pm

Salute to your work…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *