परंडा किल्ला
किल्याचा प्रकार: भुईकोट
चढाई श्रेणी: सोपी
जिल्हा: उस्मानाबाद
तालुका: परंडा
परंडयाचा भूईकोट किल्ला शहराच्या मधोमध आहे. परंडा शहरात महमंद गावान याने इ.स. १२०० मध्ये हा भुईकोट किल्ला बांधला. किल्ल्यावर इतिहास प्रसिध्द मुलुख मैदान नावाची लांब पल्ल्याची तोफ आहे. परंडा किल्ल्यात प्राचीन महादेव मंदिर व नरसिह मंदिर तसेच एक मशिद आहे.आजघडीला सर्वात जुना दस्ताऐवज परंडा किल्ल्यातीलच असल्याचे पुरातत्त्व खात्यानेदेखील मान्य केलेले आहे. किल्ल्यामधील महादेवाचे मंदिर आणि मशीदिची दिवाबत्ती होत रहावी म्हणून निजाम सरकारने १२५ हेक्टर जमिनी इनामी दिल्या होत्या.महाराष्ट्रातील अनेक किल्ले रेखीव शिल्पसौंदर्याने नटलेले आहेत. स्वराज्यावर केलेल्या आक्रमणात अनेक मंदिरं आणि शिल्पं उद्ध्वस्त झाली असली तरी मराठ्यांनी वेळीच हे आक्रमण थोपवल्याने बरीच मंदिरं आणि शिल्पं टिकली. परंडा किल्ल्यातील पाच फूट उंच आणि सहा हातांच्या गणेशाची नृत्यमुद्रेतील मूर्ती आगळीवेगळी आहे. त्याशेजारच्या आदिशेष तीर्थंकाराच्या मूर्ती असून आज भग्नावस्थेत आहेत. चांगल्या बांधणीचा हा किल्ला सध्या मात्र घाणीने वेढला गेला आहे.