मोहोळचा किल्ला
किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
जिल्हा: सोलापूर
तालुका: मोहोळ
मोहोळ हे माढ्याच्या आग्नेयेस सुमारे २० मैलांवर पुणे-सोलापूर रस्त्यावर आहे, हे गाव फार जुने आहे. येथे एक जुना भुईकोट किल्ला आहे. येथे मराठ्यांच्या अमदानीत मोहोळ सुभ्याची कचेरी असे. मोहोळच्या भुईकोटाच्या तटबंदी सुस्थितीत असून त्यात जागोजागी देवड्या केलेल्या आहेत. मुख्यद्वार हे वाड्याच्या दरवाज्याप्रमाणे बांधलेले असून चांगल्या स्थितीत आहे.याखेरीज येथील देशमुखांनी सुमारे २०० वर्षांपूर्वीं बांधलेले दोन पडके वाडे देखील मोहोळ येथे आहेत.मोहोळ मध्ये भानेश्वर व नीलकंठेश्वर अथवा चंद्रमौळी यांची दोन देवालये असून ती हेमाडपंताने बांधली असे म्हणतात.