माणिकपुंज – Manikpunj Fort

किल्ल्याची ऊंची: २०८७ फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा सातमाळ
श्रेणी: मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: नांदगाव
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात समुद्रसपाटीपासून ६२६ मीटर उंचीवर माणिकपुंज हा किल्ला आहे. गावापासून १५ मिनिटांत किल्ल्याच्या भवानीमातेच्या गुहा मंदिरापर्यंत पोहोचता येतं. किल्ल्याच्या माथ्यावर टाक्यांपासून गुहेपर्यंत गावक-यांनी पाण्याचा पाइप लावला आहे.
किल्ल्यावर गुहा, भवानीमातेचं देऊळ, पाण्याचे टाक, अनधड देव, दगडी चौथरा पिराचं थडगं आणि कातळाच्या पृष्ठभागामध्ये दगडात खोदलेली अनेक भोकं अशा ब-याच गोष्टी पाहण्यास मिळतात.
पोहोचण्याच्या वाटा
मनमाड – भुसावळ रेल्वेमार्गावरील नांदगाव स्थानकात उतरुन नांदगाव – औरंगाबाद रस्त्यावरील कासारबारी हे गाव गाठावे. या गावातून मणिकपूंजला जाणारा रस्ता आहे. मणिकपूंज गावाच्या मागील बाजूस किल्ला आहे.

राहाण्याची सोय: गडावर रहाण्याची सोय नाही.

जेवणाची सोय: गडावर जेवणाची सोय नाही.

पाण्याची सोय: गडावर पिण्याचे पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ: मणिकपूंज गावातून अर्धातास लागतो