Blog page

महिमंडणगड
किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
चढाई श्रेणी: मध्यम
डोंगररांग: सातारा, महाबळेश्वर
जिल्हा: सातारा
तालुका: जावळी
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महिमंडणगड हा किल्ला आहे.मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाक्यानंतर चिपळूणच्या दिशेने जाताना शिरगाव खोपी फाटा लागतो, शिरगाव व खोपी या कोकणी गावातून रघुवीर घाट मार्गे मेटशिंदी या महिमंडणगडाच्या पायथ्याच्या गावी पोहोचता येते.मेटशिंदी गावातून अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण जोडशीखरांच्या खिंडीत येऊन पोहोचतो, वाटेत काही ठिकाणी कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या अस्पष्ट खुणा नजरेस पडतात. पाउल वाटेने दक्षिण बाजूने एक वळसा मारून आपण माथ्यावर पोहोचतो. थोडेसे पुढे कोरीव टाक्यांची मालिका समोर येते. चावंड, अवचितगड, अलंग आदी गडावरील टाक्यांशी साधर्म्य सांगणारी हि कोरीव टाकी हा गड सातवाहन कला एवढा असावा असे निश्चित करतात. यातील एका टाक्यावर कोरीव काम आणि देवीचं रेखीव मूर्तिकाम पहावयास मिळते.किल्ल्यावरून मकरंदगड, वासोटा किल्ले दृष्टीस पडतात.