कात्रा किल्ला / थम्स अप – Katra Fort / Thumbs up
किल्ल्याची ऊंची: २६८० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा सातमाळ
श्रेणी: मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: येवला
मनमाडहून औरंगाबादला रेल्वेने किंवा रस्त्याने जाताना; मनमाड सोडल्यावर लगेच आभाळात घुसलेला सुंदर सुळका आपले लक्ष वेधून घेतो हडबीची शेंडी किंवा थम्स अप या नावाने हा सुळका ओळखला जातो. या सुळक्याजवळच अजिंठा -सातमाळ रांगेतून एका बाजूला पडलेल्या डोंगरावर अपरिचीत असा कात्रा किल्ला आहे.पहाण्याची ठिकाणेकिल्ल्याच्या दक्षिण टोकावर शंकराचे एक लहानसे मंदिर आहे. किल्ल्याच्या पश्चिमेस काही पाण्याची टाकं आहेत.पोहोचण्याच्या वाटामनमाड – औरंगाबाद या राज्य महामार्गावर क्र. १० वर मनमाडपासून ८ किमीवर एक रस्ता उजवीकडे वळतो. या रस्त्याने २ किमी अंतरावर किल्ल्याच्या पायथ्याचे कातरवाडी गाव आहे. कातरवाडी गाव गडाच्या पूर्वेस आहे. गावात आपण वाहन ठेऊन आपण दक्षिणेकडून गड चढण्यास सुरुवात केल्यावर ४५ मिनिटात गडावर पोहोचतो.राहाण्याची सोय: गडावर रहाण्याची सोय नाही, पण कात्रा बरोबरच अंकाई किल्लाही पहायचा असल्यास; अंकाई किल्ल्यावरील सीता गुहेत रहाण्याची सोय होऊ शकेल.जेवणाची सोय: जेवणाची सोय स्वत: करावी.पाण्याची सोय: एक पाण्याच टाक गडावर आहे, परंतू डिसेंबर-जानेवारी पर्यंतच त्यात पाणी असते.जाण्यासाठी लागणारा वेळ: कातरवाडीतून ४५ मिनीटे लागतात.