कैलासगड

प्रकार: गिरिदुर्ग
श्रेणी: सोपी
पायथ्याशेजारील गाव: वडूस्ते / वंद्रे

कैलासगडाविषयी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याला भेट दिली होती. किल्ला व मुळशी धरण परिसर पाहण्याजोगा आहे. पावसाळ्याच्या दिवसात किल्ल्यावर जपून भ्रमंती करावी.

कसे जाल?
) ताम्हिणी घाट मार्गे : पुणे – ताम्हिणी घाट मार्गे पिंपरी गावा पर्यंत जावे तेथून वडूस्ते गाव मार्गे वंद्रे या पायथ्याच्या गावी पोहोचावे. नजीकच्या काळात रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
)लोणावळा मार्गे (१०० किमी) : लोणावळ्याला पोहोचल्यावर आंबवणे गाव रस्त्याने साधारण ६ किमी आंतरने वंद्रे या पायथ्याच्या गावी पोहोचावे.

जेवणाची सोय: किल्ल्यावर नाही, स्वतः करावी.
पाणी: किल्ल्यावर फक्त पावसाळ्यात पाणी असते.
वेळ: पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो.