गुणवंतगड / मोरगिरीचा किल्ला

गुणवंतगड / मोरगिरीचा किल्ला
किल्ल्याची उंची: १००० फूट
किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
चढाई श्रेणी: मध्यम
डोंगररांग: बामणोली
जिल्हा: सातारा
तालुका: पाटण
पाटण वरून चिपळूणकडे जाताना एक फाटा फुटतो, पश्चिम-नैऋत्य दिशेला १० किलोमीटर अंतरावर मोरगीरीचा प्रसिद्ध गुणवंतगड किल्ला आहे. पाटण जवळील हा गड मोरगिरीचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. पश्चिम-वायव्य दिशेला दातेगड आहे, या दोन्ही गडांमधून कोयना नदी आणि हेळवाक पाटण रस्ता जातो.इतिहास:१८ व्या शतकात पेशव्यांच्या राजवटीत या गडाचा उपयोग सैन्यतळ म्हणून केला गेला होता. त्याआधी टेहळणीसाठी या गडाचा उपयोग केला जात असावा. इ.स.१८१८ च्या मराठा युद्धात हा किल्ला ब्रिटिशांकडे सोपण्यात आला.सध्या गुणवंतगडावर इतिहासाच्या कोणत्याही खाणाखुणा नाहीत. फक्त एक विहीर शिल्लक आहे.पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात देखील मोरगिरी नावाचा किल्ला आहे.