डुबेरा किल्ला / देविगड – Devigad / Dubera fort
किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
चढाई श्रेणी: सोपी
जिल्हा : नाशिक
तालुका: सिन्नर
नाशकातल्या सिन्नर तालुक्यात ठाणगाव सिन्नर रस्त्यावर सिन्नरच्या थोडेसे अलीकडे, ४ किलोमीटर अंतरावर डूबेरा नावाचे छोटेसे गाव आहे. गावाच्या मागच्या बाजूस देवीच्या देवळाचा कळस घेऊन उभा असलेला डूबेरगड दिसतो. गावाला एक प्रवेशद्वार आणि थोडीफार तटबंदी आहे. डूबेर गडाला देविगड असेही संबोधले जाते.
इतिहास
डूबेरा हे गाव पहिल्या बाजीरावाचे आजोळ आहे. येथील बर्वे घराण्यातील मुलगी बाळाजी विश्वनाथांची पत्नी झाली व इ.स १७०० मध्ये बाजीरावाचा जन्म इथेच बर्वेंच्या वाड्यात झाला. तिथे आजही त्यांचे वंशज राहतात. पूर्वभिमुख असलेल्या बर्वेंच्या वाड्याला दोन भव्य प्रवेशद्वारे आहेत व गावाला दोन भव्य वेशीही बांधलेल्या आहेत. शिवशाहीत मल्हार अंताजी बर्वे यांना हे गाव सोपवले गेले. त्यानंतर हे घराणे इथेच स्थायिक झाले. तटबुरुजाचा वाडा पाहयचा असल्यास जरूर यावे.

गडावर पाहण्यासारखे
डूबेरगडावर जाण्यासाठी अंजनेरी किल्ल्याप्रमाणे सिमेंटच्या पाचशे पायऱ्या बनवलेल्या आहेत. किल्ल्यावर एक तलाव आहे, तलावाच्या बाजूलाच सप्तशृंगी देवीचे एक मंदिर आहे, या मंदिरातील मूर्ती वाणीच्या मूर्तीसारखी असून गडावर बंद पडलेल्या टॉवरची इमारत आणि पाण्याची दोन टाकी आहेत.

जाण्याचे मार्ग
सिन्नरच्या पश्चिमेला घोटी गावच्या रस्त्यावर डूबेरा हे गाव आहे. सिन्नर वरून दर तासाला एक एस.टी या गावात जाते.
साधारण अर्धा तास गड चढायला लागतो पण गडावर पिण्यास पाणी नाही ते सोबत न्यावे लागते.
गडाच्या माथ्यावरून वायव्य दिशेला वणीचा सप्तश्रुंगगड, मार्कंडेय पर्वत, रावळ्या – जावळ्या हे जोड किल्ले इ. शिखरे दिसतात.
माहिती साभार: धनंजयराव देविदासराव विसपुते