सिंहगड किल्ला

सिंहगड किल्ला किल्ल्याची उंची: ४४०० फूट किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांगः भुलेश्वर श्रेणी: सोपी जिल्हा: पुणे तालुका: हवेली पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्र्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पाय-यांसारखा दिसणारा खांदकडाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा Read more…

गडांचा राजा राजियांचा गड, राजगड

गडांचा राजा राजियांचा गड, राजगड किल्ल्याची उंची: १३९४ मीटर किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगरांग: पुणे श्रेणी: मध्यम गडांचा राजा, राजियांचा गड बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर अन् भोरच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खो-यांच्या बेचक्यात मुरूंबदेवाचा Read more…

किल्ले तुंग / कठीणगड

किल्ले तुंग / कठीणगड किल्ल्याची उंची: ३००० फूट किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांगः लोणावळा श्रेणी: सोपी जिल्हा: पुणे तुंग किल्ल्याच्या कठीणगड नावावरून असेच वाटेल की किल्ला चढायला कठीण आहे परंतु किल्ला चढण्यास फारच सोपा आहे. पवन मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. तुंग किल्ल्याची उंची जास्त Read more…

शिवनेरी किल्ला

शिवनेरी किल्ला किल्ल्याची उंची: ३५०० मीटर किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगरांग: नाणेघाट श्रेणी: मध्यम जिल्हा: पुणे तालुका: जुन्नर शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. शिवनेरी हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला Read more…

हडसर किल्ला / पर्वतगड

हडसर किल्ला / पर्वतगड  किल्ल्याची उंची: ३२०० मीटीर किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगरांग: नाणेघाट श्रेणी: मध्यम जिल्हा: पुणे तालुका: जुन्नर सहयाद्री म्हणजे दुर्गांची खाणच. पुणे जिल्हयातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे. हडसर हा या भागातील सुंदर किल्ला आहे. नाणेघाआपासून सुरूवात करून जीवधन, चावंड, शिवनेरी, लेण्याद्रि हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी सहा Read more…

राजमाची किल्ला

राजमाची किल्ला राजमाची किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. खंडाळ्याच्या घाटात घाट सुरु होताना राजमाची पॉईंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला. येथे जाण्यासाठी लोणावळ्याहून तुंगार्ली गावात जावे नंतर थोड्या चढणीनंतर तुंगार्ली धरणाच्या समोरुन Read more…

तिकोना किल्ला / तिकोनगड

तिकोना किल्ला / तिकोनगड  किल्ल्याची उंची: ३५८० फूट किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग चढाई श्रेणी: सोपी डोंगर रांग: लोणावळा जिल्हा: पुणे तालुका: मावळ पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील तिकोना किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन दिसणारे लोहगड आणि विसापूर किल्ले आपल्याला सर्वांना माहीत आहेत. याच किल्ल्यांच्या मागील बाजूस पवनमाळ प्रांतात Read more…

विसापूर किल्ला

विसापूर किल्ला  किल्ल्याची उंची: ३०३८ फूट किल्ल्याच प्रकार: गिरिदुर्ग चढाई श्रेणी: मध्यम जिल्हा: पुणे तालुका: मावळ पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड, मात्र Read more…

इंदुरीचा किल्ला (गढी)

इंदुरीचा किल्ला (गढी) किल्ल्याचा प्रकार: भुईकोट डोंगररांग: नाही चढाई श्रेणी: सोपी जिल्हा: पुणे तळेगाव – चाकण रस्त्यावर, तळेगाव पासून ३ किमी अंतरावर इंदुरी गाव आहे. या गावात इंद्रायणी नदीच्या काठी एक छोटी गढी आहे. या गढीला इंदुरीचा किल्ला म्हणून ओळखले जाते. छत्रपती शाहू महाराजांचे सेनापती खंडेराव दाभाडे यांना वतन म्हणून Read more…

कावळ्यागड / कैवल्यगड

कावळ्यागड / कैवल्यगड डेक्कन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शोधलेल्या शिवपूर्व काळातील जासलोडगड उर्फ मोहनगड हा सध्या कावळ्या गड या नावाने प्रचलित असणारा जोडकिल्ला असावा, असा अंदाज शिवकालीन किल्ल्यांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी वर्तवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या मोहनगडाचे नेमके ठिकाण शोधल्याचा दावा डेक्कन कॉलेजातील पूरातत्त्व विभागाचे अभ्यासक सचिन जोशी Read more…

मोहनगड / दुर्गाडी किल्ला / जननी दुर्ग

मोहनगड / दुर्गाडी किल्ला / जननी दुर्ग वरंध घाट चढून गेल्यावर पुढे अशीम्बी / धारमंडप आणि मग शिरगाव नावाचे एक गाव लागते. तेथून पुढे घाट उतरत गेल्यावर दुर्गाडी गावाचा फाटा येतो. ह्या घाटातून दुर्गाडी किल्ल्याचे मोहक रूप दिसते. दुर्गाडी असे पायथ्याचे गाव असल्या कारणाने तो किल्ला दुर्गाडी म्हणूनच ओळखला जातो. Read more…

किल्ले रोहीडा / बिनीचा किल्ला / विचित्रगड

किल्ले रोहीडा / बिनीचा किल्ला / विचित्रगड  सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोर्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहीडा’. रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे Read more…

ढाकोबा किल्ला

ढाकोबा किल्ला किल्ल्याची उंची: ३९०० फुट किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग चढाई श्रेणी: मध्यम डोंगररांग: भीमाशंकर जिल्हा: पुणे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर डोंगररांगेतील ढाकोबा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. जुन्नर परिसरातील घाटाच्या अगदी कडेवर मीना मावळ आंणि कुकड मावळातील अणे-माळशेज डोंगररांगेतील हा सर्वोच्च जुळा किल्ला. दुर्ग आणि ढाकोबा या जुळ्या किल्ल्यांच्या Read more…

जीवधन किल्ला

जीवधन किल्ला ३७५४ फुट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने कठीण समजला जातो. घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ‘जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. जीवधन किल्ला नाणेघाटापासून अगदी सादेच्या अंतरावर आहे. इतिहास: शिवजन्माच्या वेळी निजामशाही अस्ताला जात होती. Read more…

जुन्नर किल्ला / गढी

जुन्नर किल्ला / गढी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला जुन्नर किल्ला गढी स्वरूपाचा असून शिवकालीन व्यापारपेठ आणि मूळ शहर यांना संरक्षण देण्यासाठी बनवण्यात आला होता. जुन्नर शहरात एसटी स्थानका समोरच जुन्नर किल्ला असून देखील फारसा प्रचलित नाही. सरकारी कचेऱ्या, न्यायालय, व्यापारी दुकाने यांच्या अतिक्रमणात किल्ल्याचे वास्तव्य दडून गेले Read more…

नारायणगड

नारायणगड नारायणगड हा किल्ला नारायणगाव शहर, जुन्नर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ५०च्या पुर्वेला आणि नारायण गावाच्या उत्तर दिशेला आहे. या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते असे सांगितले जाते. नारायणगड हा एक ऐतिहासिक गड आहे, गडावर जिवंत पाण्याच्या टाक्या आहेत. हा किल्ला टेहळनीचा गड म्हणून प्रसिद्ध होता. या गडावर दसरा व Read more…