अकोला शहर किल्ला

अकोला शहर किल्ला निजामशाहीच्या काळात हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटिश काळात १९व्या शतकात बेरार प्रांतात आले. अकोला जिल्ह्यातील आकोट येथे ब्रिटिशांची नागपूरकर भोसल्यांशी लढाई झाली होती. जुन्या किल्ल्यांचे अवशेष आजही अकोल्यात दिसतात. असदगड, नरनाळा हे त्यापैकीच होत. नरनाळा किल्ला आणि तेथील वन्यजीव अभयारण्य अकोल्याच्या प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.

नरनाळा अकोट

नरनाळा अकोट उंची: ३१६१ फूट प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांग: सातपुडा चढाईची श्रेणी: सोपी जवळचे गाव: शहानुर,अकोट जिल्हा: अकोला अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर तो पसरलेला आहे.अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्या पासुन गडावर Read more…

बाळापूर किल्ला

बाळापूर किल्ला बाळापूर किल्ला विदर्भातील अकोला जिल्ह्यात असून या जिल्ह्यामध्ये बाळापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. मान आणि महीषी या नद्यांच्या संगमावर बाळापूर वसलेले आहे. जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर असून ते बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यांच्या ठिकाणांना गाडीमार्गाने जोडलेले आहे. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याश्या Read more…

वारी भैरवगड

वारी भैरवगड वारी भैरवगड तेल्हारा तालुका अकोला जिल्ह्याच्या उत्तर – पूर्वेस आहे. तेल्हारा तालुक्याचे सर्वात उत्तर-पूर्वेचं टोक म्हणजे वारी भैरवगड स्थान. येथे वान या पूर्णा नदीच्या दक्षिण वाहिनी वान नावाच्या उपनदीवर धरण बांधण्यात आले आहे. या धरणामुळे तेल्हारा, अकोट आणि बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव व संग्रामपूर तालुक्यांतील शेतीस जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध Read more…