भैरवगड शिरपुंजे
महाराष्ट्रात ४ भैरवगड आहेत पण अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात हरिश्चंद्रगडासमोर मुळा नदीच्या खोऱ्यात शिरपुंजे आणि कुमशेत या गावांमध्ये असलेल्या भैरवगड मध्ये कसलेल्या दुर्गयात्रींना अगदी कठीण परिश्रम करायला लावणारा आणि त्या परिश्रमाचे फळ म्हणजे भैरवगड तुम्हाला त्याचा माथ्यावरून कळसुबाई पासून ते हरिश्चंद्रगड-माळशेज-नाणे घाट-भीमाशंकर पर्यंत अवाढव्य सह्याद्रीचे एक बुलंद रूपाचे दर्शन घडवतो. कुंजरगडाचा भव्य पहाड मागे पाठराखण करत उभा होता.