किल्ले संग्रामदुर्ग तोफगाडे स्वराज्यअर्पण सोहळा

चाकण येथील संग्रामदुर्ग वर तोफगाडे स्वराज्यअर्पण सोहळा संपन्न चाकण येथील संग्रामदुर्ग वरील सिमेंटच्या कठड्यावर ठेवलेल्या तोफांना आज दिनांक ०२.०६.२०१९ रोजी सह्याद्री प्रतिष्ठान चाकण विभागामार्फत तोपगाडे लावून या तोफांना पुन्हा एकदा नव्याने दिमाखात वैभवात या गाड्यांवर विराजमान करण्यात आले आहे यामुळे संग्रामदुर्ग पाहणाऱ्या पर्यटकांना यापुढे तोफ गाड्यावर विराजमान झालेल्या तोफा पहायला Read more…

किल्ले माहुली दुर्गसंवर्धनातून श्रद्धांजली

आज दिनांक २६ मे २०१९ रोजी किल्ले माहुली येथे जेष्ठ गिर्यारोहक कै. विवेक वेरुळकर सर यांच्या स्मृती निमित्त सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे दुर्गसंवर्धनातून श्रद्धांजली उपक्रम राबविण्यात आला. दिनांक ३१ मे १९९७ रोजी किल्ले माहुली येथील कल्याण दरवाजा सर करीत असताना कै. विवेक सर यांचा अपघाती मृत्यू झाला त्या स्मृती प्रित्यर्थ सह्याद्री Read more…

मल्हारगड दुर्गसंवर्धन मोहीम 2

मल्हारगड तालुका #चाळीसगाव येथील मातीच्या #ढिगाऱ्याखालीगाडल्या गेलेला अवशेष पुन्हा एकदा जगासमोर यावा #इतिहासाने त्याची नोंद घ्यावी या उद्देशाने #सह्याद्रीप्रतिष्ठानचाळीसगाव मार्फत गडावरील ही माती बाजूला करून तो मोकळा करण्यात येत आहे यासाठी #रविवार_19मेरोजी #दुसरीमोहीम घेण्यात येऊन संपन्न झाली आजच्या मोहिमेत जवळपास दोन फूट माती बाजूला करण्यात आली यामुळे या मार्गाचा बराचसा Read more…

पन्हाळगड दुर्गसंवर्धन मोहीम

किल्ले पन्हाळगड दुर्गसंवर्धन मोहीम दि.५/५/२०१९ रोजी पार पडली यामध्ये शिवकालीन हत्ती बांधण्याची जागा, छत्रपती संभाजी महाराज मंदिर व एक विहीर स्वच्छता करण्यात आली. इथून पुढच्या काळात महिन्याच्या एक सोमवारी अखंडपणे पन्हाळगडावर मोहीम चालू राहील. सह्याद्री प्रतिष्ठान, कोल्हापूर ( ९६८९०१७७३३) घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा

मल्हारगड दुर्गसंवर्धन मोहीम

आरंभ प्रचंड है …… सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या शिलेदारांनी काल 5/5/2019 पासून मल्हारगडावरील हा पुरातन अवशेष मोकळा करायला सुरुवात केली आहे, अजून काही मोहीमा केल्यानंतर माती खाली गेलेला हा अवशेष पुन्हा एकदा मोकळा श्वास घेईल. सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)

किल्ले कुलाबा तोफ संवर्धन मोहीम

कित्येक वर्षे दगडाखाली व समुद्राच्या पाण्याखाली झिजत गेलेल्या तोफेस काल सह्याद्रीच्या मावळ्यांनी अनंत कष्टांनी मोकळा श्वास दिला. ओहोटी व भरती या मधील ६ तासात हे काम करण्यात आले. लवकरच तीला कुलाबा किल्ल्यात मानाचं स्थान प्राप्त सह्याद्रीचे दुर्गसेवक मिळवून देणार. कुलाबा किल्ल्याच्या दर्या दरवाजापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर कांही वर्षापुर्वी तेथे Read more…

कोरलाई (कोर्लई) किल्ला तोफगाडा लोकार्पण सोहळा

किल्ले कोर्लई येथे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तोफगाडे लोकार्पण सोहळा संपन्न पालखी सोहळा आणि शिवगर्जनांनी गड निनादले गेली 15 वर्षे सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात आणि गडकिल्ल्यांवर जाऊन रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई किल्ल्यावर तोफगाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यापूर्वी देखील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने कर्नाळा किल्ला, तुंग किल्ला, गोरखगड, तसेच तोरणा किल्ल्यावर सागवानी दरवाजे Read more…

चंद्रपूर दुर्गदिन / दीपोत्सव

१ मे महाराष्ट्र दिन, दुर्गदिन, दिपोत्सव चंद्रपूर पठाणपुरा गेट सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र च्या वतीने दरवर्षी प्रमाने या वर्षी १ मे हा दिवस दुर्गदिन म्हणून साजरा केला जातो. दिनांक १ मे २०१९ ला सकाळी ७ वाजता चंद्रपूरा शहरातील पठाणपूरा गेट वर फुलाच्या माळनी सजावट करून दिप पूजन कराण्यात आले. सह्याद्रीच्या अग्निकुंडात Read more…

जंगली जयगड संवर्धन मोहीम

०१ मे महाराष्ट्र दिन – दुर्ग दिनाचे औचित्य साधत गडपूजन, स्वच्छता मोहीम व भगवा ध्वजारोहण करण्यात आला मोहिमे दरम्यान करण्यात आलेली कामे १) गडावर स्वच्छता करण्यात आली. २) गड देवतेचे पूजन व आजू बाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आल. ३) गडाच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला. ४) तसेच गडावर लोखंडी २० फुटी Read more…

मल्हारगडावर दुर्गदिन साजरा

सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव च्या वतीने मल्हारगडावर दुर्ग दिनाच्या निमित्ताने दुर्गोत्सव साजरा, दिव्यांची रोषणाई आणि भगवा फडकवून महाराष्ट्र दिनाच्या पूर्व रात्री स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या तमाम मावळ्यांना आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या 105 हुतात्म्यांना मानवंदना देऊन आदरांजली वाहून दुर्ग दिन साजरा करण्यात आला यावेळी चाळीसगाव सह्याद्री प्रतिष्ठानचे असंख्य शिलेदार Read more…

माहुली किल्ला दुर्गसंवर्धन मोहीम

★ सहयाद्री प्रतिष्ठान आयोजित किल्ले माहुली येथे दिनांक २८ एप्रिल रोजी रणरणत्या उन्हात पळसगड विशेष मोहीम फत्ते ● मोठ्या संख्येने दुर्गसेवकांचा सहभाग सह्याद्री प्रतिष्ठान च्या अभ्यास मोहिमेत आढळलेल्या गडाचा चौथा दरवाजा गणेश दरवाजा जो दुर्लक्षित असल्याने सध्या माती आणि दगड यात बुजला आहे आणि यास पुन्हा स्वराज्य वैभव प्राप्त करून Read more…

वेताळवाडी तोफगाडा लोकार्पण सोहळा

वेताळवाडी किल्ल्यावरील तोफेला स्कॉटलँड ची राजधानी एडिनबर्ग च्या किल्ल्यावर असलेल्या Mons meg तोफेस असलेल्या युरोपियन तोफगाड्याच्या धर्तीवर बनवलेला तोफगाडा सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत बसविण्यात आलेल्या गाड्याचे लोकार्पण करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संघटनेमार्फत दिनांक 28 एप्रिल रविवार रोजी सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी या किल्ल्यावरील अडगळीत पडलेल्या तोफेला स्कॉटलँड Read more…

उंदेरी तोफ संवर्धन मोहीम

उंदेरी फोर्ट उभ्या हिंदुस्थानला गर्व वाटावा असे काम घडलंय…. हिंदुस्थानच्या इतिहासात एका नव्या तोफेची भर…. मागच्या मोहिमेच्या वेळी ही इतिहासाला म्हणा अथवा इतिहास अभ्यासकांना म्हणा अपरिचित असनारी, जमिनीमध्ये गाडल्या गेलेली तोफ आज दि.२१/०४/२०१९ रोजी सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी बाहेर काढून त्या तोफेला नवसंजीवनी दिली. त्या तोफेचे अंदाजे वजन १ टन असावे. सहभागी Read more…

कोथळीगड तोफ संवर्धन मोहीम

#_कोथळीगड ।। कष्ट सह्याद्रीच्या मावळ्यांचे ।। भर उन्हात पुर्णपणे इतिहासाने विसरलेली दगडाखाली दबल्या गेलेली अंदाजे पाऊण ते एक टन वजन असलेली तोफ मातीतून बाहेर काढून तब्बल १०० फूट उंचावर सह्याद्रीच्या ६० मावळ्यांनी ५ तासांच्या अथक परिश्रमानंतर तहान व भुकेची तमा न बाळगता कडक उन्हामद्धे तोफेस मानाच्या स्थानी बसविले. सहभागी सर्व Read more…

रत्नदुर्ग स्वच्छता मोहीम

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र रत्नागिरी विभाग किल्ले रत्नदुर्ग स्वच्छता मोहीम 31 मार्च 2019 रोजी झालेल्या मोहिमेत गडावर साफसफाई करण्यात आली. साफ सफाई करताना प्लॅस्टिक बरोबरच दुर्दैवाची बाब म्हणजे या ही वेळेस #दारुच्या_बॉटल्स आढळून आल्या. गडावर सापडलेल्या ह्या दारुच्या बॉटल्स बाबत गडावर येणाऱ्या शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्वराज्याचे प्रवेशद्वार, किल्ले तोरणा स्वराज्यअर्पण सोहळा

सुवर्णक्षण जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्या साठी पहिलं पाऊल पडलं आणि आपलं भाग्य उजळलं तिथं आज स्वराज्याचे तोरण असणाऱ्या तोरणा गडावर सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत सागवानी महाद्वार बसवून स्वराज्यस अर्पण करण्यात आले. आज दिनांक ३१ मार्च २०१९ सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा