अजमेरा किल्ला / अजमेर किल्ला

अजमेरा किल्ला / अजमेर किल्ला – Ajmera Fort
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: बागलाण
श्रेणी: मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: सटाणा
नाशिक जिल्ह्यातील बागलाणात कर्‍हा, बिष्टा, अजमेरा, दुंधा असे कमी उंचीचे किल्ले आहेत. या किल्ल्यांबद्दल इतिहासात फारशी माहिती नाही. हे किल्ले सुटेसुटे उभे असल्यामुळे या किल्ल्यावरुन आजूबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो. त्यामुळे या किल्ल्यांचा उपयोग टेहाळणीसाठी करण्यात आला असावा. या किल्ल्यांचा आकार व रचना पाहाता यावर फारच थोडी शिबंदी रहात असावी असे वाटते.१९८५ साली नाशिकला वैनतेय गिर्यारोहण – गिरिभ्रमण या संस्थेने केलेल्या भ्रमंती आणि कागदपत्रांच्या आधारे अशा बऱ्याचश्या किल्ल्यांची माहिती जनसामान्यांसमोर आणली.