आड किल्ला – Aad Fort
किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
चढाई श्रेणी: सोपी
जिल्हा: नाशिक
तालुका: सिन्नर
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एक अतिशय आडवाटेवर असलेला पण तितकाच रमणीय असा आड किल्ला आहे. आडवाडी हे पायथ्याचे गाव, किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर असलेली साधारण ७५ पाण्याची जोडटाकी.गडावर पाहण्यासारखेकिल्ल्यावर आडवाडी गावाच्या दिशेने एका कड्यात विस्तीर्ण गुहा असून आतमध्ये देवीचे मंदिर आहे. या गुहेतच पाण्याचे टाके असून गुहेच्या शेजारी एका साधूने एक खोली बांधलेली आहे. राहण्यासाठी हि जागा उत्तम आहे. किल्ल्याच्या माथ्यावर जोत्याचे थोडेफार अवशेष असून दोन अज्ञात वीरांच्या समाध्या आहेत. किल्ल्यावर याशिवाय एक मोठा तलाव असून उत्तरेकडे गडाच्या दरवाज्याचे अवशेष आहेत.जाण्याचे मार्गठाणगाव पासून गड पायथ्याशी असलेले आडवाडी गावापर्यंतचे अंतर १० किलोमीटर आहे. सुझलॉन कंपनीच्या पवनचक्क्यांसाठी रस्ते चांगले केले असल्याने गड पायथ्यापर्यंतचे अंतर थोड्याच वेळात पार पडते.आडवाडी गावातून गड माथा गाठायला सुमारे १ तास लागतो. पावसाळ्यात गड परिसर पाहण्यासारखा आहे.
माहिती साभार: राकेश पोटफोडे