१) छत्रपती शिवरायांचा देशातील पहिला पालखी सोहळा.
२) देशातील शिवरायांची पहिली (धारकरयांची) वारी.
३) शिवरायांच्या समाधीनंतर ३३० वर्षानंतर रायगडाच्या पायथ्यापासून म्हणजेच पाचाड पासून शिवरायांना पालखीतून रायगडावर घेवून जाणारी पहिली यात्रा.
४) जन्मस्थळापासून ते समाधीस्थळापर्यंत शिवरायांना मोठ्या डौलात घेवून जाणारी पहिली यात्रा.
५) छत्रपती शिवरायांच्या कार्याचा व्याख्यान, पोवाडे,मर्दानी खेळ या मार्फत जागर करणारी पहिली यात्रा.
६) शिव-शंभू चरित्राचा प्रसार शिवनेरी ते रायगड या प्रवासात येणाऱ्या प्रत्येक गावात करणारी पहिली यात्रा.
७) शिवरायांनी रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ ज्यांच्या हस्ते करून घेतली त्याच जंगम समाजातील व्यक्तीकडून रायगडावर शिवरायांना अभिषेक करणारी ३३६ वर्षानंतरची पहिली यात्रा.
८) शिवरायांच्या समाधीनंतर महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकाच झेंड्याखाली आणणारी पहिली यात्रा.
जय शिवराय !! जय शंभूराजे !! जय गडकोट !!
आयोजक :-
सह्याद्री प्रतिष्ठान.
शिवरथ-यात्रा उत्सव समिती.
सह्याद्री राष्ट्र सेना.
सह्याद्री विध्यार्थी परिषद.