श्री गणेश बालमित्र मंडळ, प्लॉट क्रमांक १, शिवाजी नगर, गोवंडी व सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेशोत्सवानिमित्त गडसंवर्धन जागृती मोहीम देखाव्याच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. ह्या माध्यमातून मुंबई शहरातील किल्ल्यांची सध्याची वस्तुस्थिती तसेच सह्याद्री प्रतिष्ठान च्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती मांडण्यात आली आहे. गडकोट हे आपली अस्मिता आहे आणि ते टिकवण्यासाठी प्रत्येक सजग नागरिकाने ह्या दुर्गसंवर्धन चळवळीत सहभागी व्हावे हाच ह्या #व्यथा_गडकोटांची या संकल्पनेचा उद्देश आहे. या संकल्पनेत आपण सहभागी होऊन जे अनमोल सहकार्य केले आहे त्याबद्दल आम्ही सदैव ऋणी आहोत.

#बाप्पामाझा
#व्यथागडकोटांची

सह्याद्री प्रतिष्ठान
घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा.