माहुली किल्ला दुर्गसंवर्धन मोहीम

★ सहयाद्री प्रतिष्ठान आयोजित किल्ले माहुली येथे दिनांक २८ एप्रिल रोजी रणरणत्या उन्हात पळसगड विशेष मोहीम फत्ते

● मोठ्या संख्येने दुर्गसेवकांचा सहभाग

सह्याद्री प्रतिष्ठान च्या अभ्यास मोहिमेत आढळलेल्या गडाचा चौथा दरवाजा गणेश दरवाजा जो दुर्लक्षित असल्याने सध्या माती आणि दगड यात बुजला आहे आणि यास पुन्हा स्वराज्य वैभव प्राप्त करून देण्या साठी सह्याद्री प्रतिष्ठान शहापूर विभाग यांनी आपल्या महादरवाजा येथील पूर्वानुभवातून गणेश दरवाजा येथे प्रथम मोहीम राबवली.

★सदर मोहिमेत खलील कामे करण्यात आली
१) गणेश दरवाजा लगत असलेल्या पायऱ्या पासून सुरुवात करण्यात आली, पूर्ण पणे माती, कारावी आणि साबराच्या काटेरी झुडुपात गुरफटलेल्या पायऱ्या मोकळ्या करून तेथे काम करण्या साठी योग्य विसाव्याची जागा तयार केली.

२) तसेच गणेश दरवाजाची मुख्य कमान तसेच अनेक कोरीव / घडीव पाषाण जे दरवाजाचे आणि तेथील तटबंदीचे अवशेष आहे त्यांना दरवाजा पुढेच असलेल्या घळीतून बाहेर काढून योग्य ठिकाणी ठेवण्यात आले.

३) गणेश दरवाजा जो डोंगराच्या घळीत आहे तो आजवर अनेक वर्षाच दुर्लक्ष आणि उपेक्षा या मुळे कोणत्याही प्रकारचे संवर्धन काम न झाल्याने पावसाळ्यात घळीत वाहून येणाऱ्या दगड मातीच्या चिखलात गाडला गेला आहे. तीच साचलेली माती आणि दगड बाजूला करून पुनरवैभव प्राप्त करून देण्याचा दृष्टीने आज सहयाद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी सुरुवात केली आहे.

■ सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे पुढील काळात सातत्याने मोहिमा घेऊन महादरवाजा आणि गणेशदारवाजा यांचे संवर्धन कार्य तडीस नेण्यास तत्पर असेल.

मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सर्व दुर्गसेवकांचे खूप खूप आभार.

★विशेष आभार –
प्रकाश राजे सर
सह्याद्री प्रतिष्ठान मुरबाड विभाग

★ पुढील दुर्गसंवर्धन मोहिमेत सहभागी होण्या साठी खालील क्रमांकावर संपर्क करावा. 👇🏻
सुयोग जगे – ८२३७२३२२२०
तेजस उदिवाल – ७३५०४८४८१३
तुषार दुधाळे – ९६०४९९०८३६
गणेश पवार – ८४४६७५२७३७
गौरव राजे – ७०६६७९४३३४
अनिरुद्ध थोरात – ८९८३४७८७८९

◆ सह्याद्री प्रतीष्ठान, शहापूर विभाग