चंद्रपूर दुर्गदिन / दीपोत्सव

१ मे महाराष्ट्र दिन, दुर्गदिन, दिपोत्सव
चंद्रपूर पठाणपुरा गेट

सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र च्या वतीने दरवर्षी प्रमाने या वर्षी १ मे हा दिवस दुर्गदिन म्हणून साजरा केला जातो.
दिनांक १ मे २०१९ ला सकाळी ७ वाजता
चंद्रपूरा शहरातील पठाणपूरा गेट वर फुलाच्या माळनी सजावट करून दिप पूजन कराण्यात आले.
सह्याद्रीच्या अग्निकुंडात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात – अज्ञात मावळ्यांना मानवंदना देण्यात आली. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १०५ हुतात्म्यांना या दुर्गादिनी सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने अभिवादन करून मानवंदना देण्यात आली
या प्रसगी सह्याद्री प्रतिष्ठानचे आणी इको-प्रो चे मावळे कार्यक्रमास आवर्जुन उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यात सह्याद्री प्रतिष्ठानचे जेष्ट सल्लागार मा.श्री. शशिकांत देशकर सह्याद्री प्रतिष्ठानचे माहाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. दिलीपभाऊ रिंगणे, सह्याद्री प्रतिष्ठानचे चंद्रपूर संपर्क प्रमुख मा.श्री निमेश मानकर संजय तुरिले, राजेंद्र वांढरे साहेब, माजी नगरसेवक विजय भाऊ चाहारे, आॅड.गणेश गिरधर, सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर चे मावळे तसेच इको-प्रो चे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थीत होते…

  

सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर विभाग

(घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा)