किल्ले संग्रामदुर्ग तोफगाडे स्वराज्यअर्पण सोहळा

चाकण येथील संग्रामदुर्ग वर तोफगाडे स्वराज्यअर्पण सोहळा संपन्न

चाकण येथील संग्रामदुर्ग वरील सिमेंटच्या कठड्यावर ठेवलेल्या तोफांना आज दिनांक ०२.०६.२०१९ रोजी सह्याद्री प्रतिष्ठान चाकण विभागामार्फत तोपगाडे लावून या तोफांना पुन्हा एकदा नव्याने दिमाखात वैभवात या गाड्यांवर विराजमान करण्यात आले आहे यामुळे संग्रामदुर्ग पाहणाऱ्या पर्यटकांना यापुढे तोफ गाड्यावर विराजमान झालेल्या तोफा पहायला मिळतील सह्याद्री प्रतिष्ठानने महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवर तोफांचे संवर्धन करण्याचे काम हाती घेतले असून गेल्या वर्षभरापासून हे काम अविरतपणे सुरू आहे .

या तोफगाडा स्वराज्यअर्पण सोहळ्या प्रसंगी सरसेनापती सत्यशीलराजे दाभाडे, सरदार विंचूरकर, सरदार रणजितसिंह गरुड देशमुख, सरदार इंद्रजित जेधे, संदिपजी पोतनीस व विलास वहाने यांच्या शुभहस्ते तोफगाडे स्वराज्यास अर्पण करण्यात आले.

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र
घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा