किल्ले माहुली दुर्गसंवर्धनातून श्रद्धांजली

आज दिनांक २६ मे २०१९ रोजी किल्ले माहुली येथे जेष्ठ गिर्यारोहक कै. विवेक वेरुळकर सर यांच्या स्मृती निमित्त सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे दुर्गसंवर्धनातून श्रद्धांजली उपक्रम राबविण्यात आला.
दिनांक ३१ मे १९९७ रोजी किल्ले माहुली येथील कल्याण दरवाजा सर करीत असताना कै. विवेक सर यांचा अपघाती मृत्यू झाला त्या स्मृती प्रित्यर्थ सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे गेल्या ३ वर्षा पासून प्रतिष्ठान तर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
श्रद्धांजली कार्यक्रमात कल्याण चे गिर्यारोहक श्री. गजानन वैद्य तसेच कै. विवेक वेरुळकर यांचे चुलत बंधू श्री. सारंग मुळे यांची विशेष उपस्थिती होती.
पूर्वनियोजित आराखड्या प्रमाणे सकाळी ७.०० वाजता श्रद्धांजली कार्यक्रम झाला. त्या नंतर सह्याद्री प्रतिष्ठान च्या श्री. सुयोग जगे आणि श्री. गणेश पवार यांच्या नेतृत्वात गणेश दरवाजा येथे श्रमदान मोहीम पार पाडण्यात आली.
२५ ते ३० गिरीप्रेमींनी या मोहिमेत सहभाग दर्शवला. दुर्गसंवर्धनातून श्रद्धांजली चा उपक्रम यशस्वी रित्या राबवण्यात आला.

सह्याद्री प्रतिष्ठान शहापुर विभाग