किल्ले निवती उर्फ गुढे किल्ला रत्नागिरी

सह्याद्री प्रतिष्ठान संस्था महाराष्ट्रभर गडकिल्ले संवर्धनाचे कार्य करत आहे. आजवर संस्थे मार्फत ७००हुन अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा राबवल्या असून राज्य पुरातत्व विभाग वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने गडकिल्यांचे संवर्धन करत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ल्याना प्राचीन इतिहास लाभला असून शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याना नवी संजीवनी दिली आणि किल्ले हे त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत.

ता.चिपळूण मध्ये असलेल्या निवते उर्फ गुढे किल्यावर सहयाद्री प्रतिष्ठान च्या गुहागर विभागाने किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर दिशा दर्शक फलक लावले आणि स्वछता मोहीम राबविली.
या मोहिमेत गुढे ग्रामपंचायत ने मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
मोहिमेत सरपंच मोरे मॅडम उप सरपंच श्री संजय कदम तसेच श्री योगेश अनिल तांबे यांनी मोहिमेला विशेष सहकार्य केले.
सहभाग:- मनिष कदम, दिपेश ठोंबरे, नयन चांदोरकर, स्वप्निल राऊत, अक्षय आगरे, विनय काताळकर, पंकज चांदोरकर, सवेश चांदोरकर, अभिषेक चांदोरकर, नितेश चांदोरकर

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र
रत्नागिरी विभाग