किल्ले कुलाबा तोफ संवर्धन मोहीम

कित्येक वर्षे दगडाखाली व समुद्राच्या पाण्याखाली झिजत गेलेल्या तोफेस काल सह्याद्रीच्या मावळ्यांनी अनंत कष्टांनी मोकळा श्वास दिला.
ओहोटी व भरती या मधील ६ तासात हे काम करण्यात आले.
लवकरच तीला कुलाबा किल्ल्यात मानाचं स्थान प्राप्त सह्याद्रीचे दुर्गसेवक मिळवून देणार.
कुलाबा किल्ल्याच्या दर्या दरवाजापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर कांही वर्षापुर्वी तेथे बुरुज होता कारण त्याच्या पाऊलखुणा आजही पाहावयास मिळतात. त्याच बुरुजावर कधीकाळी विराजमान असणारी ही तोफ बुरुज उध्वस्त झाल्यानंतर त्याच्या चिरासहीत खाली पडली. त्याच बुरुजावरून किल्ल्यांच रक्षण करणारी आणी गनिमास धडकी भरवणारी तोफ गेल्या कित्येक वर्षात त्याच बुरुजाच्या चिरा आपल्या उरावर घेऊन जमिनीत गाडली गेली. भरती आली की पुर्ण बुडून जायची. गेल्या कित्येक वर्षांपासून असं चालू होतं. स्थानिक लोक व इतर खूप कमी लोकांना याची माहिती होती. परंतू दुर्दैवाने कोणताही मर्द यासाठी पुढे आला नाही पण १ मे रोजी मिळालेल्या माहितीनुसार सह्याद्री प्रतिष्ठान उरणचे अभिषेक ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. लगेचच ही मोहीम आखली गेली. सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग विभागाच्या मावळ्यांनी नेहमीसारखी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर झेलत आज तीला पुर्ण ताकदीने यशस्वी केली.
पुढील मोहिमेत या तोफेस कुलाबा किल्ल्यावर स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. तोफेच वजन व तेथील मोठे मोठे दगड वरून भरती ओहोटीचा खेळ यातून मार्ग काढत हे काम करावे लागणार. एक तर हा पर्याय किंवा जागेवरून समुद्रात घेऊन जाऊन तराफा नवीन तयार वरून घेऊन जावे लागणार आहे. डोक्यासोबतच शरीराचे अनंत कष्ट करावे लागणार आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की आमचे सहयाद्री प्रतिष्ठान अलिबागचे मावळे आपल्या कष्टातून हे शिवदुर्गाचं काम यशस्वी करतील.
या मोहिमेत सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना मानाचा त्रिवार मुजरा.
पुन्हा एकदा शतशः ऋणी

सहयाद्री प्रतिष्ठान अलिबाग