अंकाई-टंकाई दुर्गदर्शन मोहीम

सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव आयोजित दुर्गदर्शन मोहीम संपन्न सह्याद्री प्रतिष्ठानच्या चाळीसगाव येथील शिलेदारांनी दिनांक १६ सप्टेंबर रोजी अंकाई-टंकाई या दोन जोड किल्यांवर जावून दुर्गदर्शन मोहीम घेतली या मोहीमेत किल्ला पाहत असतांनाच किल्यावर भविष्यात करावयाच्या कामांचे देखील नियोजन करण्यात आले किल्यावर सध्या पुरातत्त्व विभागा मार्फत मोठ्या प्रमाणात काम चालू आहे तसेच येथे धार्मिक स्थान असल्याने भाविक भक्त देखील मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे दिसून आले मात्र हे भाविक आपल्या बरोबर प्लास्टिक पिशव्या तसेच प्लास्टिक बाटल्या आणून त्या तेथेच टाकून देत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा कचरा किल्यावर पसरला आहे म्हणूनच येथे सूचना फलक लावून जागृती करण्याची गरज आहे किल्यावर लेण्या, भव्य प्रदेशद्वार तटबंदी वाड्या चे अवशेष आजही भक्कम आहेत तसेच सभोवताली निसर्गरम्य डोंगररांग पसरलेली असल्यामुळे किल्ल्यावरुन हे सारे दृश्य विहंगम दिसते पुढील काळात येथे स्वच्छता मोहीम घेऊन सुचना फलक लावण्याची सह्याद्री प्रतिष्ठानची योजना आहे.

पुढील दुर्गसेवकांनी यात सहभाग घेतला होता

या मोहीमेत शरद पाटील,रविंद्र सुर्यवंशी,गजानन मोरे योगेश शेळके,प्रल्हाद शिंदे ,विनोद शिंपी,
रविंद्र दुशिंग,संदिप वराडे,संभाजी पाटील हेमंत भोईटे,प्रशांत जाधव,अजय घोरपडे,सचिन बोराडे,पलश राखुंडे,समीर शिंपी,साहिल शिंपी,यश चिंचोले.

 

सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र
चाळीसगाव विभाग